Many join NCP! State General Secretary Atul Wandile gave a warm welcome

हिंगणघाट विधानसभा मतदार संघामध्ये मागील दोन महिन्यांपासून अनेकांनी पक्षप्रवेश केला असून, आजही अनेकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी नाते जोडले, असे अतुल वांदिले म्हणाले.

    हिंगणघाट : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले (NCP State General Secretary Atul Wandile )यांच्या पक्ष प्रवेशानंतर हिंगणघाट विधानसभा मतदार संघामध्ये मागील दोन महिन्यांपासून अनेकांनी पक्षप्रवेश केला असून, आजही अनेकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी (NCP)  नाते जोडले.

    अतुल वांदिले (Atul Wandile) यांच्या हस्ते राष्ट्रवादी पक्ष कार्यालयात डॉ. विलास मेश्राम, वर्षा विलास मेश्राम, मीना शर्मा, कमलेश शर्मा, धनराज शिरुडे, शरदराव कुळसंगे, पंकज वांगे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश करून हाताला राष्ट्रवादीची (NCP) घड्याळ बांधली. मतदारसंघातील अनेकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर सर्व मान्यवरांचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अतुल वांदिले यांनी पक्षात स्वागत करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.