‘महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप येणार’; भाजप प्रदेशाध्यक्षांनी तारीखच सांगितली अन् म्हणाले…

राज्यात भाजपच्या पाठिंब्यावर एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी सरकार स्थापन केल्यानंतर शिंदेंच्या शिवसेनेत ठाकरे गटातील नेतेमंडळींसह इतर पक्षातील नेत्यांचा प्रवेश झाला आहे. त्यानंतर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.

मुंबई : राज्यात भाजपच्या पाठिंब्यावर एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी सरकार स्थापन केल्यानंतर शिंदेंच्या शिवसेनेत ठाकरे गटातील नेतेमंडळींसह इतर पक्षातील नेत्यांचा प्रवेश झाला आहे. त्यानंतर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी मोठं विधान केले आहे. ‘येत्या 14 तारखेला मोठा पक्षप्रवेश होणार आहे. पक्षप्रवेशाचा मोठा भूकंप राज्याला बसणार आहे. आम्ही बोलाची कढी करत नाही’ असे त्यांनी म्हटले आहे.

राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्यानंतर भाजप आणि शिंदे गटात अनेक नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा प्रवेश सुरु आहे. त्यात आत्तापर्यंत अनेकांनी भाजपमध्ये तर काहींनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यानंतर आता बावनकुळे यांनी मोठं विधान केले आहे. यामध्ये त्यांनी म्हटले की, ’14 तारखेला राज्यात मोठा भूकंप होणार आहे. मोठा पक्षप्रवेश होणार आहे. पक्षप्रवेशाचा भूकंप राज्याला बसणार आहे. आम्ही बोलाची कढी करत नाही’ असे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, हे सांगत असताना त्यांनी मात्र कोणत्याही पक्षाचं नाव घेतलेलं नाही.

दरम्यान, यापूर्वी अनेकदा अशाप्रकारे भाजप नेत्यांकडून पक्षप्रवेशाबाबतची विधानं करण्यात आली आहे. त्यानंतर आता बावनकुळे यांनी राज्यात पक्षप्रवेशाचा मोठा भूकंप होणार असल्याचे म्हटले आहे.

मनसेबाबत म्हणाले…

राज्यात महापालिका निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांमध्ये भाजप आणि शिंदे गटासोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेना युती करणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. त्यावर ते म्हणाले, ‘राज ठाकरेंनी काय निर्णय घ्यायचा तो त्यांचा अधिकार आहे. पण त्यांच्यासोबत युतीचा कुठलाही प्रस्ताव आमच्याकडे नाही’, असे स्पष्ट केले.