नायलॉन मांजामु‌ळे अनेकांच्या जीवावर ‘संक्रांत’, घरा बाहेर पडला अन् पतंगाच्या मांज्याने गळाच चिरला

सुदैवाने यामध्ये त्यांचे प्राण वाचले. सध्या अनेक ठिकाणी कायद्याने बंदी असलेला नायलॉन मांज्याची छुप्या पद्धतीने विक्री सुरू आहे. तर काही पतंगप्रेमी शेजारील तालुक्यात जाऊन नायलॉन मांजा घेऊन येत आहेत. मकरसंक्रांत सण १ दिवसावर आला असून मांजा बनवणे, पतंग खरेदीसह नागरिक पतंगोतस्वाच्या तयारीला लागले आहे.

    अहमदनगर : मकर संक्रातनिमित्त पतंगबाजीचा खेळ खेळला जातो. परंतु, सध्या पतंग उडवण्यासाठी आता नायलॉन मांजाचा (nylon netting) उपयोग जास्त होत असल्याचे निदर्शनास येत आहे. या नायलॉन मांजाचा जीवाला मोठा धोका आहे. आज कोपरगाव शहरातील धान्यांचे व्यापारी आनंद गंगवाल हे दूध घेण्यासाठी धारणगाव रस्त्यांवरून मोटारसायकलवर जात असताना पोस्ट ऑफिसजवळ एक पतंगाला असलेल्या मांजाने त्यांचा गळा चिरला ( throats were cut by moth netting) आहे.

    सुदैवाने यामध्ये त्यांचे प्राण वाचले. सध्या अनेक ठिकाणी कायद्याने बंदी असलेला नायलॉन मांज्याची छुप्या पद्धतीने विक्री सुरू आहे. तर काही पतंगप्रेमी शेजारील तालुक्यात जाऊन नायलॉन मांजा घेऊन येत आहेत. मकरसंक्रांत सण १ दिवसावर आला असून मांजा बनवणे, पतंग खरेदीसह नागरिक पतंगोतस्वाच्या तयारीला लागले आहे. नायलॉन मांजामुळे अनेकांचे गळा चिरणे, हात कापणे अशा घटना होत असतात.

    नायलॉन मांजावर बंदी असतानाही अनेक पतंग शौकीन खुलेआम याचा वापर करतात. त्यामुळे प्रत्येक वर्षी नागरिक जखमी होण्याच्या घटना मकरसंक्रांतीच्या काळात घडत असतात. मात्र, यावेळी संक्रांत जवळ असताना आता याचा फटका बसू लागला आहे. चोरी छुपे नायलॉन मांजाची खरेदी-विक्री होत आहे. आरोग्यासाठी घातक असलेल्या या मांजावर न्यायालयाने घातलेली बंदी धाब्यावर बसवीत विक्रेते चोरी छुपी मांजा विकत असून पादचारी, दुचाकीस्वार आणि पक्षी या मांजाचे बळी ठरत आहेत.