अग्निवीर सैन्य भरतीविरोधातही माओवाद्यांनी पेटवले रान; ६३ पानी पत्रातून खबळजनक खुलासा

नक्षलवाद्यांचा विलय सप्ताह बुधवार, २१ सप्टेंबरपासून साजरा होत आहे. त्यानिमित्त नक्षलवाद्यांची प्रतिबंधित संघटना मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष माओवादी यांनी एक ६३ पानांचे पत्र जारी केले आहे. त्या पत्रात हा उल्लेख आहे.

    नागपूर – कृषी कायदेविरोधी आंदोलनासह अग्निवीर सैन्य भरतीविरोधात झालेल्या आंदोलनात माओवाद्यांचा सहभाग असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे देशभरात सरकारविरोधात झालेल्या विविध आंदोलनात माओवाद्यांनी सक्रिय सहभाग नोंदवल्याचे एका पत्रातून समोर आले आहे.

    नक्षलवाद्यांचा विलय सप्ताह बुधवार, २१ सप्टेंबरपासून साजरा होत आहे. त्यानिमित्त नक्षलवाद्यांची प्रतिबंधित संघटना मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष माओवादी यांनी एक ६३ पानांचे पत्र जारी केले आहे. त्या पत्रात हा उल्लेख आहे.

    नक्षलविरोधी अभियानाचे पोलिस उपमहानिरीक्षक संदीप पाटील म्हणाले की, नक्षलवाद्यांनी आता तीन गोष्टींवर आपले लक्ष केंद्रीत केले आहे. त्यासाठी पार्टी, आर्मी आणि युनायटेड फ्रंट म्हणजेच संयुक्त मोर्चा यांचा सहभाग आहे. यात पार्टी म्हणजे पाॅलिट ब्युरो मेंबर वगैरे असतात. आर्मी म्हणजे जंगलात काम करणारे नक्षलवादी. या सोबतच युनायटेड मोर्चा म्हणजेच संयुक्त मोर्चा म्हणजेच जनतेत सहभागी होऊन लोकांना माओवादाकडे आकर्षित करणे.