मोदींविरुद्ध सोलापुरातून उमेदवार?; मराठा आंदोलकांची रणनीती ठरली

आगामी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्याविरुद्ध वाराणसीतून लढण्याचा निर्णय राज्यातील मराठा आरक्षण आंदोलकांनी घेतला आहे.

    सोलापूर : आगामी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्याविरुद्ध वाराणसीतून लढण्याचा निर्णय राज्यातील मराठा आरक्षण आंदोलकांनी घेतला आहे. सोलापूर या राखीव मतदारसंघातून मराठा समाजाचे लोक ऑनलाईन पद्धतीने वाराणसीमधून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

    शहरातील विश्रामगृहावर रविवारी झालेल्या समाजाच्या बैठकीत हा ठराव घेण्यात आला. याखेरीज जिल्ह्यातील माढा लोकसभा मतदारसंघातही प्रत्येक गावातून 10 उमेदवारी दाखल करण्याचे ठरले आहे. राज्यातील सोलापूर लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव असून, याच जिल्ह्यातील माढा मतदारसंघ खुल्या प्रवर्गासाठी आहे. मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण दिले असले तरी ओबीसी कोट्यातून आरक्षणाची मागणी केली जात आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत अर्ज भरून सरकारची कोंडी करण्याचा समाजाचा प्रयत्न आहे.

    बॅलेट पेपरवर मतदानाचा आग्रह

    ईव्हीएम मशीनवर उमेदवारांची मर्यादा आहे. त्यामुळे मराठा बांधव हे ईव्हीएमची मर्यादा ओलांडून बॅलेट पेपरवर मतदान घेण्यासाठी भाग पाडणार आहेत.