पुण्याच्या राजकारणासाठी वसंत मोरे जालन्यात! जरांगे पाटलांच्या बैठकीला उपस्थित

    जालना – मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची आज अंतरवली सराटी येथे लोकसभा निवडणूकीच्या दृष्टीकोनातून बैठक पार पडत आहे. अनेक मराठा बांधव व कार्यकर्ते जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी अंतरवली सराटी येथे दाखल झाले आहेत. यामध्ये आता पुण्याचे धडाकेबाजे नेते अशी ओळख असलेले वसंत मोरे

    यांनी देखील जालना गाठले आहे. वसंत मोरे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या बैठकीला उपस्थिती लावली आहे.

    पुण्याच्या लोकसभा निवडणूकीमध्ये वसंत मोरे हे तिसरे उमेदवार असणार आहेत. वसंत मोरे यांनी आज मनोज जरांगे पाटील यांची जालन्यामध्ये जाऊन भेट घेतली आहे. जरांगे पाटील यांच्या बैठकीत राज्यातील 36 लोकसभा मतदासंघाचे अहवाल त्यांना मिळाले असून त्याचे वाचण व अभ्यास मनोज जरांगे करत आहेत. पुणे लोकसभा निवडणूककरिता वसंत मोरे व सहकारी अंतरवाली सराटी येथे दाखल झाले असुन ते मनोज जरांगे यांची भेट घेणार आहे. वसंत मोरे हे जरांगे यांना पुणे लोकसभा मधून आपल्याला उमेदवारी द्यावी करीता भेट घेणार आहे जरांगे यांच्या सोबत भेटल्यावर ते या बाबत माहिती देणार आहे.

    मनोज जरांगे  पाटील हे आज होणाऱ्या बैठकीमध्ये लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मराठा बांधवांशी चर्चा करणार आहेत. निवडणूका लढवणे, उमेदवार उभा करणे आणि पुढील दिशा ठरवणे यासारख्या महत्त्वाच्या विषयावर आज मनोज जरांगे पाटील चर्चा करणार आहेत. त्यामुळे वसंत मोरे यांची त्यांच्यासोबतची आजची भेट महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

    काही दिवसांपूर्वी वसंत मोरे यांनी मनसेला सोडचिठ्ठी दिली. त्यानंतर वसंत मोरे हे आपल्या लोकसभा निवडणूक लढवणार असल्याच्या भूमिकेवर ठाम आहेत. काल वसंत मोरे यांनी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली. त्यानंतर आता वसंत मोरे यांनी आज मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार आहेत. मराठा आंदोलक जरांगे पाटील हे वसंत मोरे यांना पाठिंबा देणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या भेटीमुळे पुण्यातील राजकीय समीकरणे बदलणार का हे देखील उत्सुकतेचे ठरणार आहे.