“मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे सर्वपक्षीय बैठकीत एकमत मात्र.. ;  वाचा आरक्षणाबाबत काय म्हणाले शरद पवार

मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे सर्वपक्षीय बैठकीत एकमत झाले आहे. सर्वपक्षीय बैठकीत आरक्षण देत असताना दुसऱ्याच्या ताटातील देता कामा नये सर्वांची भुमिका होती. आरक्षणासाठी जनगणना होणे आवश्यक आहे.

    मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे सर्वपक्षीय बैठकीत एकमत झाले आहे. सर्वपक्षीय बैठकीत आरक्षण देत असताना दुसऱ्याच्या ताटातील देता कामा नये सर्वांची भुमिका होती. आरक्षणासाठी जनगणना होणे आवश्यक आहे.कुणाच्या ताटातून न देता मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. इतरांना धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. त्यासाठी संसदेत जाऊन काही गोष्टी करायला हव्या आहेत. अधिवेशनात या संदर्भात काय होतं याकडे लक्ष आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी व्यक्त केले. ते साताऱ्यात बोलत होते. (Sharad Pawar On Maratha Reservation )

    काय म्हणाले शरद पवार?
    मराठा आरक्षण हे समाजाला मिळालं पाहिजे. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही जी सर्वपक्षीय बैठक बोलवली होती त्यात सगळ्यांचं एकमत झालं. मात्र मराठा समाजाला आरक्षण देताना दुसऱ्याच्या ताटातलं काढून द्या अशी भूमिका कुणाचीही नाही. मराठा आरक्षण दिलं गेलं पाहिजे. अन्य घटकांच्या हितांची जपणूक करु आणि मराठा समाजाला न्याय देऊ असा निर्णय केंद्राने घ्यावा असा आग्रह आम्ही केला असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.मराठा आरक्षणामुळे सर्वसामान्य माणसाचे प्रश्न, नुकसान, दुष्काळ याकडे दुर्लक्ष होतात हे खरे आहे. केंद्र आणि राज्य या दोन्ही सरकारने लक्ष घातले पाहिजेत, असे देखील शरद पवार म्हणाले.