MLA Shivendrasinharaje meet Manoj jarange
MLA Shivendrasinharaje meet Manoj jarange

    सातारा : आम्ही काेणाचे तरी काढून आम्हा मराठ्यांना आरक्षण द्या, असे आजपर्यंत म्हटलेले नाही. आमच्या हक्काचे आम्हाला मिळावे ही भूमिका आमची आहे. ज्येष्ठ मंडळींनी समाजात तेढ निर्माण हाेईल, अशी भूमिका घेऊ नये, असे आवाहन आमदार शिवेंद्रसिंहराजे भाेसले यांनी केले. दरम्यान, आरक्षणावरून
    समाजा-समाजाविराेधात काेण तेढ निर्माण करीत असेल तर संभाजीराजे छत्रपती यांच्या भूमिकेला आमचे समर्थन असेल, असेही राजेंनी नमूद केले
    मनोज जरांगे पाटील यांची तिसऱ्या टप्प्यातील दौऱ्याला सुरुवात
    मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी तिसऱ्या टप्प्यातील दौऱ्याला सुरुवात केली आहे. आज शनिवार सातारा येथील गांधी मैदानावर जरांगे पाटील यांची आशीर्वाद सभा झाली. या सभेनंतर जरांगे पाटील यांनी जलमंदिर पॅलेस येथे श्री भवानी मातेची दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी खासदार उदयनराजे भाेसले  यांची तसेच सुरुची बंगला येथे आमदार शिवेंद्रसिंहराजे भाेसले  भेट घेतली
    शिवेंद्रसिंहराजेंनी जरांगे पाटील यांचे केले स्वागत
    सुरुची बंगला येथे आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी जरांगे पाटील यांचे स्वागत केले. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत शिवेंद्रराजे म्हणाले आम्ही सर्वजण कुटूंबांसह मराठा मोर्चात सहभागी होतो. आजची साता-यातील सभेस देखील जिल्ह्यातील समाज बांधवांनी माेठा प्रतिसाद दिला.
    मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत कायम राहू
    आम्ही मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत कायम राहू. संपूर्ण राज्य त्यांनी हादरवले. कुंभकरणाच्या झोपेतून जागं करण्याचे काम मनोज जरांगे यांनी केले आहे. आमच्या हक्काचं‌ मिळावे ही आमची मागणी असल्याचे शिवेंद्रराजेंनी नमूद केले.
    लोकशाहीतील योद्धे असल्याचे काैतुक
    मनोज जरांगे पाटील हे लोकशाहीतील योद्धे असल्याचे काैतुक शिवेंद्रराजेंनी जरांगे पाटील यांचे केले. दरम्यान समाजाच्या विरोधात कोण भूमिका घेत असेल तर संभाजीराजेंनी मंत्री छगन भुजबळ यांच्या विषयी केलेल्या मागणीला आमचा पाठींबा राहील असेही राजेंनी म्हटले.