संभाजीराजेंना उमेदवारी नाकारल्याने संताप मराठा क्रांती मोर्चा आक्रमक; मुंबईत जमवाजमव, शक्तीप्रदर्शनाची तयारी

छत्रपती संभाजीराजे यांना महाविकास आघाडीने अपक्ष उमेदवार म्हणून पाठिंबा द्यावा, हा प्रस्ताव शिवसेनेने नाकारल्यानंतर मराठा क्रांती मोर्चाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. संजय राऊत यांचा सत्तेचा माज महाराष्ट्रातील शिवप्रेमी जनता उतरवेल, असा इशारा मराठी क्रांती मोर्चाने दिला आहे(Maratha Kranti Morcha angry over Sambhaji Raje's rejection of candidature).

  मुंबई : छत्रपती संभाजीराजे यांना महाविकास आघाडीने अपक्ष उमेदवार म्हणून पाठिंबा द्यावा, हा प्रस्ताव शिवसेनेने नाकारल्यानंतर मराठा क्रांती मोर्चाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. संजय राऊत यांचा सत्तेचा माज महाराष्ट्रातील शिवप्रेमी जनता उतरवेल, असा इशारा मराठी क्रांती मोर्चाने दिला आहे(Maratha Kranti Morcha angry over Sambhaji Raje’s rejection of candidature).

  छत्रपतींच्या अपक्ष उमेदवारीला संजय राऊत सातत्याने विरोध करताना दिसत आहेत. एकीकडे प्रियंका चतुर्वेदी, उर्मिला मातोंडकर यांना कुठल्याही प्रकारच्या अटी शर्ती न घालता राज्यसभेवर पाठवण्याची तयारी दाखवता आणि ज्या छत्रपतींच्या नावावर एवढे वर्ष राजकारण करत आहात, सत्ता भोगत आहेत त्यांनाच विरोध करता. या शिवसेनेचा ‘शिव’च आमच्या छत्रपतींचा आहे, असे असताना देखील राऊत सातत्याने विरोध करताना दिसत आहेत, असे मराठा क्रांती मोर्चेचे समन्वयक अंकुश कदम यांनी म्हटले आहे.

  राष्ट्र्वादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी हा विषय आधी सुरू केला होता. त्यानंतर ज्या दिशेने तो विषय गेला, ते सगळे वेगळेच काहीतरी झाले आहे. कदाचित संभाजीराजे छत्रपती यांची कोंडी करण्याचा प्रयत्न यातून झाला आहे. पण तो त्या- त्या पक्षाचा प्रश्न आहे. त्यामुळे त्यावर मी बोलण्याचे कारण नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

  छत्रपती संभाजीराजेंना राज्यसभेची उमेदवारी देण्याचा विषय शिवसेनेकडून संपला आहे. त्यावर आता अधिक बोलणार नाही, असे शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज स्पष्ट केले. संभाजी ब्रिगेड, छावा, मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेला मोठी किंमत चुकवावी लागेल, असा इशारा दिला आहे. त्यावर जे अशी वक्तव्य करत आहेत, त्यांनी मागील १५ दिवसांच्या घडामोडी समजून घ्याव्यात, असे आवाहन राऊत यांनी केले.

  छत्रपती संभाजीराजेंना राजकीय पक्षाचे वावडे असण्याचे काहीही कारण नाही. याआधी त्यांनी राष्ट्रवादीकडून लोकसभेची निवडणूक लढवली आहे. त्यामुळे आम्ही शिवसेनेत येण्याची त्यांना ऑफर दिली तर आमचे कुठे चुकले, असा सवालही संजय राऊत यांनी केला.

  छत्रपती घराण्याचे वारस संभाजीराजे हे स्वत:हून शिवसेनेकडे मदत मागण्यासाठी गेले होते. मात्र, शिवसेनेने त्यांना सन्मानित करण्याऐवजी उमेदवारी नाकारली. खरेतर शिवसेनेला छत्रपतींच्या गादीचा सन्मान करण्याची संधी चालून आली होती. पण ही संधी शिवसेनेने गमावली, असे मत मराठा आरक्षणाचे याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी व्यक्त केले.