बीडमध्ये मराठा आंदोलन पुन्हा पेटलं; एसटी बस फोडल्याने लालपरी पुन्हा एकदा बंद

बीडमध्ये मराठा आंदोलन पुन्हा एकदा पेटल्याचा चित्र पाहायला मिळत आहे. बीडच्या पाडळशिंगी परिसरामध्ये मराठा आंदोलकांनी पुन्हा एकदा लालपरी टार्गेट करत फोडल्याने, रात्री 10 वाजल्यापासून बीडमधील सर्व बस बंद करण्यात आल्या आहेत.

    बीड : बीडमध्ये मराठा आंदोलन पुन्हा एकदा पेटल्याचा चित्र पाहायला मिळत आहे. बीडच्या पाडळशिंगी परिसरामध्ये मराठा आंदोलकांनी पुन्हा एकदा लालपरी टार्गेट करत फोडल्याने, रात्री 10 वाजल्यापासून बीडमधील सर्व बस बंद करण्यात आल्या आहेत.

    तसेचं धुळे -सोलापूर महामार्गावरील बीडच्या चौसाळा येथे, संभाजी महाराज चौकात टायर जाळून रस्ता देखील आडवण्यात आला होता. त्यानंतर कल्याण- विशाखापटनम महामार्गावरील सिरसदेवी परिसरामध्ये देखील टायर जाळून रस्ता अडवण्यात आला होता. यामुळे सुरक्षेची उपाययोजना म्हणून बस आगाराच्या वतीने बीड जिल्ह्यातील बस बंद करण्यात आल्या आहेत.

    मात्र याच लालपरीचे चाक थांबल्याने सर्वसामान्य प्रवाशांचे पुन्हा एकदा हाल होत आहेत. खाजगी वाहनधारकांकडून आर्थिक लूट देखील केली जात आहे. यामुळे आता या सर्वसामान्य प्रवाशांचे हाल सोडवण्यासाठी सरकार नेमकं काय निर्णय घेणार ? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.