संग्रहित फोटो
संग्रहित फोटो

बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या ६२ व्या गळीत हंगामाच्या शुभारंभ कार्यक्रमास सभेच्या स्थळी जात असताना मराठा समाजाच्या युवकांनी एक मराठा, लाख मराठा !, आरक्षण आमच्या हक्काचं !! अशी घोषणाबाजी केली. त्यामुळे कार्यक्रमाच्या ठिकाणी गोंधळ निर्माण झाला.

    माळेगाव : बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या ६२ व्या गळीत हंगामाच्या शुभारंभ कार्यक्रमास सभेच्या स्थळी जात असताना मराठा समाजाच्या युवकांनी एक मराठा, लाख मराठा !, आरक्षण आमच्या हक्काचं !! अशी घोषणाबाजी केली. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) मंगळवारी बारामती तालुका दौऱ्यावर असताना हा प्रकार घडला. त्यामुळे कार्यक्रमाच्या ठिकाणी गोंधळ निर्माण झाला.

    या प्रकारामुळे मराठा समाज आरक्षणाच्या मुद्दावरुन चांगलाच आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. पोलिसांनी घोषणाबाजी करणाऱ्या कार्यकर्त्यांना सभेच्या ठिकाणाहून समजूत काढून बाहेर काढले. त्यानंतर अजित पवारांसह राज्यात सत्तेत असणाऱ्या नेत्यांना बारामतीच नव्हे तर राज्यात बंदी घालण्यात यावी, अशी आग्रही भूमिका युवकांनी मांडली आहे. रविवारी बारामती तालुक्यातील पणदरे या ठिकाणी पवार यांचा नागरिक सत्कार ठेवण्यात आला होता.

    मराठा समाजाला आरक्षण देण्यास राज्य सरकार टाळाटाळ करत असल्याच्या विरोधात अजित पवारांच्या जाहीर सभेत मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांची घोषणाबाजी केली. अजित पवारांच्या सभेत मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांची घोषणाबाजी बारामतीत अजित पवारांसह सरकारला विरोध मराठा समाजाने दर्शविला; तर राज्यातील प्रत्येक गावात नेत्यांना प्रवेश बंद करण्याचा इशारा यावेळी आंदोलकांनी दिला आहे. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेला बारामतीत थेट मराठा समाजाने अजित पवारांना विरोध दर्शविला आहे.

    या ठिकाणी देखील मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी पवारांना घेराव घालून तुमची भूमिका काय?, असा सवाल उपस्थित केला होता. सोमवारी माढा तालुक्यातील पिंपळनेर याठिकाणी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाला गेल्यानंतर त्या ठिकाणी देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले होते. मात्र, स्वतःच्या बारामतीत असा प्रकार कधी घडेल, अशी अपेक्षा अजित पवारांना नसावी.

    मराठा समाज आरक्षणासाठी आक्रमक झाला असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या सभेत घोषणाबाजी करणाऱ्या मराठा समाजातील कार्यकर्त्यांवर कोणतेही गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.