मराठा आंदोलक आक्रमक! भाजप प्रदेशाध्यक्षांना दाखविले काळे झेंडे ; तुळजापुरात आरक्षणासाठी आंदोलकांची घाेषणाबाजी

भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे हे महा विजय 2024 अभियान अंतर्गत लोकसभा जनसंवादासाठी धाराशिव जिल्ह्यात दौऱ्या निमित्त आले असता तुळजापूर येथे कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेचे दर्शन घेऊन त्यांनी महापूजा केली . यावेळी मराठा आंदोलकांनी मराठा आरक्षणासाठी मंदिर परिसराबाहेर काळे झेंडे दाखवून निषेध करत घोषणाबाजी केली.

    तुळजापूर  : भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे हे महा विजय 2024 अभियान अंतर्गत लोकसभा जनसंवादासाठी धाराशिव जिल्ह्यात दौऱ्या निमित्त आले असता तुळजापूर येथे कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेचे दर्शन घेऊन त्यांनी महापूजा केली . यावेळी मराठा आंदोलकांनी मराठा आरक्षणासाठी मंदिर परिसराबाहेर काळे झेंडे दाखवून निषेध करत घोषणाबाजी केली. यावेळी अर्जुन साळुंके, महेश गवळी, अजय साळुंके, यांच्यासह अनेक आंदोलकांनी  काळे झेंडे दाखवत घोषणाबाजी केली . मराठा आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. मंदिर महाद्वारा समोर आणि आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या संपर्क कार्यालयामध्ये प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांचा सत्कार करण्यात आला.
    तत्पूर्वी दर्शनानंतर प्रसारमाध्यमाशी बोलताना बावनकुळे यांनी सांगितले की सर्वपक्षीय ठराव करून मराठा आरक्षणास सर्वांनी मान्यता दिलेली आहे ओबीसी च कुठलेही आरक्षण कमी न करता टिकणारे मराठा आरक्षण मिळणारच आर्थिक दृष्ट्या दुर्बल आणि मागासलेली बाजु कोर्टात उद्धव ठाकरे सरकारला मांडता न आल्यामुळे मराठा आरक्षण कोर्टात टिकले नाही त्यामुळे आरक्षण मिळाले नाही. माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला काळे झेंडे दाखवण्यापेक्षा कोणामुळे आरक्षण कोर्टात टिकले नाही त्यांना काळे झेंडे दाखवणे योग्य होईल असे मत त्यांनी व्यक्त केले.
    यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य, आमदार राणाजगजितसिंह पाटील, नितीन काळे,अँड. अनिल काळे, नारायण नन्नवरे, गुलचंद व्यवहारे, शांताराम पेंदे,बाळासाहेब शिंदे, विजय शिंगाडे, किशोर साठे, आनंद कंदले,  महानंदा पैलवान, संतोष बोबडे, धैर्यशील दरेकर, साहेबराव घुगे, लखन पेंदे, सागर पारडे, गिरीश देवळालकर, दिनेश बागल, आदिसह भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.