मराठा आरक्षणाचा तिढा सुटणार? मनोज जरांगे-पाटील काय घेणार निर्णय? राज्यात कुठे मोर्चे कुठे बंद, जाणून घ्या…

राज्य सरकारने कुणबी जातप्रमाणपत्र देणार असल्याचं जाहीर केलं आहे. तर आज मनोज जरांगे हे आपला निर्णय स्पष्ट करणार आहेत. मराठा आरक्षणावरुन आजही पडसाद राज्यभर पाहयला मिळताहेत. राज्यातील काही भागात आज बंद तर मोर्चे काढले जाताहेत.

    मुंबई – सध्या राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला आहे. (Maratha Reservation) जालन्यात आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्यानंतर याचे पडसाद राज्यभर पाहयला मिळताहेत. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे-पाटील हे जालन्यात मागील १० दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. त्यांची प्रकृती खालावली आहे. राज्य सरकारने कुणबी जातप्रमाणपत्र देणार असल्याचं जाहीर केलं आहे. तर आज मनोज जरांगे हे आपला निर्णय स्पष्ट करणार आहेत. मराठा आरक्षणावरुन आजही पडसाद राज्यभर पाहयला मिळताहेत. राज्यातील काही भागात आज बंद तर मोर्चे काढले जाताहेत. (maratha reservation crack will be solved what will manoj jarange patil decide where are the marches closed in the state know)

    मनोज जरांगे पाटील आज निर्णय घेणार

    दरम्यान, मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी मनोज जरांगे पाटील आमरण उपोषणाला बसले आहेत. आज उपोषणाचा त्यांचा आज १० वा दिवस आहे सरकारने दिलेल्या आश्वासनांमधला एक शब्दही इकडे तिकडे व्हायला नको, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. त्यामुळं आज सकाळी सहकाऱ्यांसोबत चर्चा करुन मनोज जरांगे पाटील उपोषणाबाबत निर्णय घेणार आहेत. त्यामुळं ते काय निर्णय घेणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

    कुठे बंद…, कुठे मोर्चे…

    दुसरीकडे मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी पुण्यात मोर्चा काढण्यात येत आहे. तर आज जालन्यात झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ सांगली आज पाळण्यात येणार आहे. तर काल करमाळा शहर बंद ठेवत भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला. मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली. दुसरीकडे मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथे सकल मराठा समाजाच्या वतीने अंगावर आसूड ओढत आंदोलन करण्यात आले.