मनोज जरांगेंची प्रकृती बिघडली; तातडीने रुग्णालयात केले दाखल

मराठा आंदोलनाचे नेत मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली आहे.

    जालना – मराठा आंदोलनाचे नेत मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली आहे. राज्यामध्ये उन्हाचा तडाखा वाढला आहे. अनेक जिल्ह्यामध्ये 40 अंशाहून अधिक उन्हाचा पारा गेला आहे. त्यामुळे अनेकांच्या प्रकृतीमध्ये बिघाड झाला आहे. याचा फटका मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना देखील बसला आहे. त्यांना छत्रपती संभाजीनगरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

    बीड दौऱ्यावेळी मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती बिघडली

    मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी राज्यव्यापी आंदोलन उभे केले. त्यांनी उपोषण आणि आंदोलन उभे केले. जरांगे पाटील यांनी मोठा लढा उभा केल्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले होते. त्यानंतर आता देखील आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील हे महाराष्ट्र दौरा करत आहेत. मराठा समाजाच्या भेटीगाठी घेत आहेत. दरम्यान, बीड दौऱ्यावेळी मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती बिघडली. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी असलेल्या गॅलेक्सी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

    गॅलक्सी रुग्णालयात दाखल

    मनोज जरांगे पाटील हे बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्यान अचानक त्यांची प्रकृती बिघडली आहे. त्यांना आता छत्रपती संभाजीनगरच्या गॅलक्सी रुग्णालयात आणण्यात आलं आहे. त्यांच्यावर आता उपचार सुरु आहेत. उपोषणामुळे मनोज जरांगे यांची प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना याआधी गॅलक्सी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण ते सध्या उपोषणाला बसले नव्हते. त्यामुळे त्यांना उन्हाचा त्रास झाल्याचा अंदाज आहे. मनोज जरांगे लवकर बरे व्हावेत, अशी प्रार्थना त्यांच्या समर्थकांकडून केली जात आहे.