मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीसांवर घणाघात; म्हणाले, ‘मला अटक करा मग…’

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आता पुन्हा एकदा महाराष्ट्र दौरा सुरु केला आहे. अंतरवाली सराटी येथून त्यांनी बीडमध्ये प्रवास केल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला.

    बीड – मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आता पुन्हा एकदा महाराष्ट्र दौरा सुरु केला आहे. अंतरवाली सराटी येथून त्यांनी बीडमध्ये प्रवास केल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी मनोज जरांगे पाटील म्हणाले, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाटील यांनी पुन्हा एकदा इशारा दिला आहे. “फडणवीस पोलिसांचे कान फुकत आहेत. फडणवीस यांनी मला आत टाकून दाखवावेच, त्यानंतर भावनिक लाट काय असते? हे त्यांना दिसेल. असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.

    मनोज जरांगे पाटील म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या विरोधात मराठा समाजाने उमेदवारी अर्ज भरावेत, असा निर्णय मराठा समाजाने घेतला आहे का? मराठे काहीही करू शकतात. सरकारने तर आमचे बॅनर आणि फलक काढण्याच्या सूचना दिल्या आहेत. पण निवडणुकीत तुम्हालाही आमच्या गावात बॅनर लावायचे आहेत. आमच्या घरावर पत्रक चिकटवायचे आहेत. तेव्हा आम्हीही सहन करणार नाही, असे म्हणत पुन्हा एकदा जरांगे पाटील यांनी फडणवीस यांच्या आरोप केले आहेत. तसेच न्यायालयाने १३ मार्चला पुढील तारीख दिली होती. पण एका रात्रीत गृहमंत्र्यांनी तारीख बदलून २३ फेब्रुवारी करून घेतली. त्यानंतर एका गुप्त बैठकीत ठराव झाला, ‘मनोज जरांगेला १० टक्के आरक्षण स्वीकारायला लावा, नाहीतर त्याला गुंतवा.’ असा ठराव झाल्याचे कळल्यामुळे त्यादिवशी आमच्याकडून आक्रमक प्रतिक्रिया दिली गेली. अशी प्रतिक्रिया जरांगे पाटील यांनी दिली.

    पुढे ते म्हणाले, “माझी मान जरी कापून नेली, तरी मी एक इंचभर मागे हटणार नाही. पण त्यानंतर भावनिक लाट काय असते? हे देवेंद्र फडणवीस यांना दाखवून देऊ. त्यांचा सगळा सुपडा साफ होईल. या आंदोलनामागे शरद पवार यांचा हात आहे, असा आरोप भाजपाकडून केला जातो. पण खुद्द गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात खुलासा केला की, शरद पवार यांच आंतरवाली सराटीमध्ये अपमान झाला. त्यांना उभ्या आयुष्यात कुणी एवढं बोललं नसेल, तेवढं बोललं गेलं. तुम्हीच एका तोंडाने बोलता त्यांचा अपमान झाला आणि दुसऱ्या तोंडाने तेच मागे असल्याचे सांगता. पण आमच्या मागे-पुढे कुणीही नाही”, असेही जरांगे यांनी सांगितले.