
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या समोर सुरु असलेल्या उपोषण स्थळी मराठा दिग्विजय पाटील व उदय सरनोबत या युवकांनी मुंडण करून सरकारचा निषेध केला.पिंड दान करून मेलेल्या सरकार मधील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या फोटोला चप्पलचे हार घालून जोडे मारले.
इस्लामपूर : येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या समोर सुरु असलेल्या उपोषण स्थळी मराठा दिग्विजय पाटील व उदय सरनोबत या युवकांनी मुंडण करून सरकारचा निषेध केला.पिंड दान करून मेलेल्या सरकार मधील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या फोटोला चप्पलचे हार घालून जोडे मारले.
मराठा आरक्षणाबाबत चालढकल करणाऱ्या वृत्तीचा निषेध व्यक्त करताना मराठा आमदारांच्या नावाने बोंब मारली.वाळवा तालुक्यातील मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाजातर्फे बी जी पाटील यांनी इस्लामपुरात तहसीलदार कार्यालया समोर सुरू केलेल्या बेमुदत आमरण उपोषणाचा आज तिसरा दिवस होता. तालुक्यातील नागरिक व विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी हजर राहून पाठींबा जाहीर केला.
वाळवा तालुक्यातील सर्व मराठा समाज आक्रमक झालेला आहे.सकाळ पासुन तालुक्यातील प्रत्येक गावातील मराठा बांधव जरांगे पाटील यांना पाठींबा देण्यासाठी गावपातळीवर आंदोलन करीत आहेत.
तहसीलदार कार्यालयाच्या समोर खुर्च्या टाकून त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार व देवेंद्र फडणवीस यांच्या फोटोला चप्पलचे हार घालून निषेधार्थ बोंब मारण्यात आली.
यावेळी राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष विजय पाटील, काँग्रेसचे इस्लामपूर शहराध्यक्ष राजेंद्र शिंदे, उबाठाचे इस्लामपूर शहराध्यक्ष उदय सरनोबत, मराठा क्रांती मोर्चाचे दिग्विजय पाटील, राजरामबापू साखर कारखान्याचे संचालक विठ्ठल पाटील, शैलेश पाटील,राजेंद्र कांबळे, संचालिका डॉ.योजना शिंदे, सचिन पवार व अन्य तरुण उपस्थित होते.