मराठा आरक्षण ओबीसीतूनच घेणार, बॅनर काढण्याचे प्रकार बंद करा; जरांगेंची सरकारवर टीका

मराठा समाजाला ओबीसीमधूनच आरक्षण घेणार असल्याचे सांगत बॅनर हटविण्याचे प्रकार बंद करा, अशी मागणी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी  केली. उपमुख्यमंत्री फडणवीस, मंत्री महाजन यांच्यावरही त्यांनी टीका केली.

    बीड : मराठा समाजाला ओबीसीमधूनच आरक्षण घेणार असल्याचे सांगत बॅनर हटविण्याचे प्रकार बंद करा, अशी मागणी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी  केली. उपमुख्यमंत्री फडणवीस, मंत्री महाजन यांच्यावरही त्यांनी टीका केली.
    किट्टी आडगाव येथील सभेत ते राज्य सरकारला उद्देशून म्हणाले, ”मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण घेतल्याशिवाय माघार घेणार नाही. तुम्ही खोटे गुन्हे दाखल करा, मात्र मराठ्यांना ओबीसीमधूनच आरक्षण मिळवून देणार असून, अजूनही वेळ गेलेली नाही. तुम्ही दिलेले दहा टक्के आरक्षण मराठा समाज घेणारही नाही.
    आरक्षण फक्त सरकारमधील २०० ते २५० लोकांनाच मान्य आहे, सर्वसामान्य मराठ्याला मान्य नाही. या प्रश्नावरून गावागावांत लावलेले बॅनर काढत आहात, बॅनरवर दहशतवादी केंद्र असे लिहिले आहे का? समाजाला विनाकारण त्रास देण्याचे काम उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करू नये.”