मराठा आरक्षण न दिल्यास राज्यात अराजकता ; आरएसएसकडून देशात सांगलीत विष कालवण्याचे काम करीत असल्याचा मराठा स्वराज्य संघाचा आरोप

 राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) कडून देशात विष कालवण्याचे काम सुरु आहे. नुकतेच सांगलीत आलेल्या आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत हे कोणत्याही घटनात्मक पदावर नसताना त्यांना झेड प्लस सुरक्षा देवून जनतेचा पैसा उधळला जात असल्याचा आरोप मराठा स्वराज्य संघाचे अध्यक्ष महादेव साळुंखे यांनी केला.

    सांगली :  राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) कडून देशात विष कालवण्याचे काम सुरु आहे. नुकतेच सांगलीत आलेल्या आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत हे कोणत्याही घटनात्मक पदावर नसताना त्यांना झेड प्लस सुरक्षा देवून जनतेचा पैसा उधळला जात असल्याचा आरोप मराठा स्वराज्य संघाचे अध्यक्ष महादेव साळुंखे यांनी केला.

    साळुंखे यांनी दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात त्यांनी म्हटले आहे, वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी राममंदिराच्या उद्घाटनादरम्यान देशात दंगली उसळण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यांची ही भीती खरी ठरु नये अशी अपेक्षा आहे. राममंदिर उद्घाटनाचा गैरफायदा घेवून काहीजणांकडून हल्ल्याची शक्यता वाटत आहे.

    हिंदू-मुस्लीम वाद पेटवून त्याच्या बळावर भाजप लोकसभा जिंकण्याची यांनी शक्यता म्हटला असल असल्याचे ते म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणबाबतीत फेब्रुवारीमध्ये विशेष अधिवेशन बोलावणार असल्याचे सांगितले. तोपर्यंत लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागेल. त्यामुळे सरकारचा आरक्षणाबाबत निव्वळ वेळकाढूपणा सुरु असल्याचे साळुंखे यांनी सांगितले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ही निती आहे. त्यामुळे मराठा समाजाने उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर विश्वास ठेवू नये, असे आवाहन साळुंखे यांनी सांगितले. तसेच जर मराठा शासनाक आरक्षण दिले नाही, तर राज्यात अराजकता माजायला वेळ लागणार नसल्याचे साळुंखे यांनी सांगितले.