Manoj Jarange Patil announced in Sangli

    सांगली : ज्यातील सरसकट मराठ्यांना ओबीसी प्रवर्गातूनच आरक्षण मिळणार आहे. मराठे कुणबी असल्याचे दाखले आता सर्वत्र मिळाले आहेत. त्यामुळे सर्व मराठे कुणबी आहेत हे आपोआप सिद्धच झाले आहे. त्यामुळे यापुढे सरसकट मराठ्यांना ओबीसीमधूनच आरक्षण मिळणार आहे हे निश्चित झाले असल्याची घोषणा मराठा योद्धा मनोज जरांगे-पाटील यांनी सांगलीत तरूण भारत स्टेडियम येथे भव्य सभेत बोलताना केली. शुक्रवारी भर उन्हात त्यांनी तब्बल एक तास सभा घेवून आरक्षणाचा विषय कसा संपणार आहे याची विस्तृत माहिती देत असतानाच यापुढील आंदोलनाची काय दिशा असेल तेही त्यांनी सांगितले.

    आजूबाजूच्या गावातून मोठ्याप्रमाणात मराठा बांधव उपस्थित

    मराठा योध्दा मनोज जरांगे-पाटील यांच्या तिसऱ्या टप्प्यातील दौ्र्याला नुकतीच सुरवात झाली आहे. त्यामध्ये त्यांची सांगलीत रखरखन्या उन्हात भरदुपारी तीन वाजता ही सभा झाली. या सभेला सांगलीसह आजूबाजूच्या गावातून मोठ्याप्रमाणात मराठा बांधव आणि महिला भगिनी उपस्थित होत्या. सांगली शहरात त्यांचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले तसेच त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. ७० वर्षापासुन मराठा समाजावर अन्याय सुरू आहे.

    मराठा समाज ७० वर्षांपासून आरक्षणापासून वंचित

    मनोज जरांगे-पाटील म्हणाले, मराठा समाजाला ७० वर्षांपासून आरक्षणापासून वंचित ठेवण्यात आले आहे. मराठा समाजावर ७० वर्ष झाले हा अन्याय सुरू आहे. पण आता हा अन्याय दुर करण्याची ही निश्चित वेळ आली आहे. सरकारला कोणत्याही परिस्थितीत सरसकट मराठा बांधवांना ओबीसी प्रवर्गातूनच आरक्षण द्यावे लागणार आहे. मराठा समाजाच्या नावाचे आरक्षण काही मंडळींनी पळवून नेले आहे. आता त्यांना आमच्या वाट्याचे आरक्षण आम्ही पळवून नेवून देणार नाही. मराठा समाजाने आरक्षणाच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे हे सर्व घडले आहे. पण आता मराठा समाज शहाणा झाला आहे. तो या अन्यायाविरूध्द निश्चित लढणार आहे. आणि हे आरक्षण घेतल्याशिवाय आपण गप्प बसणार नाही.

    सरकारला २४ डिसेंबरपर्यंत मुदत
    आम्ही सरकारला २४ डिसेंबरपर्यंत आरक्षण देण्याची मुदत दिली आहे. त्यामुळे तो पर्यंत कोणत्याही परिस्थितीत सरकारला आपण डिस्टर्ब करून चालणार नाही. सरकारकडून २४ डिसेंबरपर्यंत कागदपत्रे तपासण्याची मोहिम सुरू करण्यात आली आहे. या कागदपत्रातून त्यांना कुणबी नोंदी आढळून येतील या नोंदी आढळून आल्यावर ते तात्काळ यावर कायदा करतील असे आपणास वाटते आहे. त्यामुळे २४ डिसेंबरपर्यंत त्यांना कोणीही डिस्टर्ब करू नका आपले आंदोलन शांततेत सुरूच ठेवा एक डिसेंबरपासुन साखळी उपोषणाचा टप्पा सुरू होणार आहे. त्यामध्ये सांगलीतील प्रत्येक गावात हे साखळी उपोषण झाले पाहिजे असेही त्यांनी सांगितले. आरक्षणासाठी कोणतेही हिंसक आंदोलन करण्याची गरजच लागणार
    नाही असेही त्यांनी सांगितले.

    अनेक मातब्बर नेते आले पण आपण काही मागे सरलो नाही.

    आपले उपोषण सोडवण्यासाठी आणि आपपाला शब्दात गुंडाळण्यासाठी अनेक मातब्बर नेते आले होते. पण त्यांच्या गोड-गोड बोलण्याला आपण काही ही भुललो नाही. कारण हे आपणाला कोपऱ्यात घेणार हे माहिती होते. आपण त्यांना सरळ सांगितले. जी काही चर्चा व्हायची आहे ती थेट लोकासमोरच झाली पाहिजे आणि जे काही आहे ते थेट लोकांना सांगायचे त्यामुळे हे मातब्बर नेते जर चलबिचल झाले पण आपण आरक्षण घेण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत मागे सरलो नाही असेही त्यांनी सांगितले.

    आपल्या लेकरासाठी तर आता लढा मराठ्यांना एकमेकांची पाय ओढण्यात वेळ घालविला आहे. आता यापुढे असे न करता मराठ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहा. आपल्या लेकरासाठी तर आरक्षणाची ही लढाई लढा असे आवाहन मनोज जरांगे-पाटील यांनी यावेळी केले.

    शेती करतो तो कुणबी

    मराठ्यांनी आजपर्यंत शेती आणि लढाई केली. या देशात आरक्षण हे कामावरून मिळाले आहे. मग शेती करणाऱ्या मराठ्यांना विदर्भात आरक्षण मिळते मग राज्यातील इतर मराठ शेतकऱ्यांचे काय असा सवालही त्यांनी केला. त्यामुळे मराठे हे शेती करणाऱ्या मराठ्यांना कुणबी आरक्षण मिळाळेच पाहिजे आणि ते मिळणारच आहे असेही मनोज- जरांगे पाटील यांनी सांगितले.