उत्तरेकडील थंड वारे राज्याच्या दिशेने वाहत असल्याने महाराष्ट्रात थंडीची लाट कायम आहे. गेल्या २४ तासांत राज्यातील किमान तापमानात २ ते ७ अंशांची घट नोंदवण्यात आली असून कडाक्याची थंडी आणखी काही दिवस कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
आज वातावरण मुख्यतः कोरडे राहणार असून उत्तरेकडील भागात थंडीचा जोर कायम राहील. तर दक्षिण महाराष्ट्रात किमान तापमानात किंचित वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, जळगाव, यवतमाळ आणि कोकण परिसरात धुक्यासह थंडीची तीव्रता जाणवत आहे. नागरिकांनी सकाळी व रात्री उबदार कपड्यांचा वापर करण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे.














