Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Top Marathi News Today Live: धर्मेंद्र यांना रुग्णालयातून डिस्चार्ज; बॉबी देओलसोबत घरी परतले

२०२२ मध्ये शिवसेनेत उद्भवलेल्या फुटीनंतर एकनाथ शिंदे यांच्या गटाने ३७ आमदारांच्या बहुमताच्या आधारावर सत्ता मिळवली. निवडणूक आयोगाने शिंदे गटाला ‘शिवसेना’ नाव व धनुष्यबाण चिन्ह दिले, तर ठाकरे गटाला ‘मशाल’ चिन्ह मिळाले.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Nov 12, 2025 | 11:50 AM
LIVE
Top Marathi News Today Live:

Top Marathi News Today Live:

Follow Us
Close
Follow Us:
  • 12 Nov 2025 11:50 AM (IST)

    12 Nov 2025 11:50 AM (IST)

    PM मोदी आणि चौथे ड्रुक ग्याल्पो यांची भेट

    पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भूतान दौऱ्यावर गेले आहेत. यावेळी त्यांनी महामहिम चौथे ड्रुक ग्याल्पो यांची भेट घेतली आहे. याबाबत सोशल मीडिया पोस्ट लिहित सांगितले की, यावेळी भारत-भूतान संबंध अधिक दृढ करण्यासाठी त्यांनी वर्षानुवर्षे केलेल्या व्यापक प्रयत्नांचे कौतुक केले. ऊर्जा, व्यापार, तंत्रज्ञान आणि कनेक्टिव्हिटीमधील सहकार्यावर चर्चा केली. आमच्या अ‍ॅक्ट ईस्ट धोरणाशी सुसंगत असलेल्या गेलेफू माइंडफुलनेस सिटी प्रकल्पातील प्रगतीचे कौतुक केले.

    Had a wonderful meeting with His Majesty the Fourth Druk Gyalpo. Appreciated his extensive efforts over the years towards further cementing India-Bhutan ties. Discussed cooperation in energy, trade, technology and connectivity. Lauded the progress in the Gelephu Mindfulness City… pic.twitter.com/It8O8TTYbi

    — Narendra Modi (@narendramodi) November 12, 2025

     

  • 12 Nov 2025 11:40 AM (IST)

    12 Nov 2025 11:40 AM (IST)

    कडाक्याच्या थंडीमुळे विठुरायालाही गरम कपडे परिधान

    महाराष्ट्रामध्ये थंडीची लाट आली असून अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान अतिशय कमी झाले आहे. यामुळे पंढरपूरच्या विठुरायाला देखील हुडहुडी भरली आहे. हिवाळ्यामुळे पांडुरंग आणि रखुमाईला स्वेटर, शाल आणि कोनटोपी घालण्यात आली आहे. विठुरायाचे हे मनमोहक रुप सर्वांना भावते आहे.

  • 12 Nov 2025 11:20 AM (IST)

    12 Nov 2025 11:20 AM (IST)

    बिहारमध्ये मतदानानंतर आता मतमोजणीची वेळ

    बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचार तोफा थंडावल्या आहेत. बिहारमध्ये दोन टप्प्यामध्ये मतदान प्रक्रिया पार पडली असून नेत्यांचे भवितव्य मतदानपेटीमध्ये बंदिस्त झाले आहे. यानंतर आता मतमोजणी केली जाणार आहे. संपूर्ण देशाचे लक्ष बिहारच्या निकालाकडे लागले आहे.

  • 12 Nov 2025 11:10 AM (IST)

    12 Nov 2025 11:10 AM (IST)

    अभिनेते धर्मेंद्र यांना रुग्णालयातून डिस्चार्ज

    ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. धर्मेंद्र यांना जुहू इथल्या घरी नेण्यात आलं असून त्यांच्यावरील पुढील उपचार घरीच सुरू राहतील, अशी माहिती समोर येत आहे. धर्मेंद्र यांची प्रकृती सुधारल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

  • 12 Nov 2025 11:05 AM (IST)

    12 Nov 2025 11:05 AM (IST)

    लढाऊ समाजसेवक सेनापती बापट यांची जयंती

    सशस्त्र क्रांतिकारक, तत्वचिंतक व लढाऊ समाजसेवक सेनापती बापट यांची आज जयंती. सेनापती बापट यांचे खरे नाव पांडुरंग महादेव बापट असे होते. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी गुप्तपणे बॉम्ब तयार करण्याची कला शिकून घेतली आणि त्यानंतर सेनापती बापट आणि हेमचंद्र दास या आपल्या सहकारी मित्रांना हे तंत्र शिकण्यासाठी पॅरिसला पाठविले. पुण्यामध्ये शिक्षण घेतलेल्या सेनापती बापट यांनी परदेशामध्येही शिक्षण घेतले.

  • 12 Nov 2025 11:00 AM (IST)

    12 Nov 2025 11:00 AM (IST)

    Free Fire Max: लवकरात लवकर क्लेम करा आजचे रिडीम कोड्स

    फ्री फायर मॅक्सचे 12 नोव्हेंबरचे रिडीम कोड्स

    • VQRB39SHXW10IM8
    • ZRJAPH294KV5
    • MCPW2D1U3XA3
    • 4PAS6TQ87CXMLNV
    • NRD8L6Y7M4E29U1
    • YW2B64F7V8DHJM5
    • X99TK56XDJ4X
    • CT6P42J7GRH50Y8
    • VQRB39SHXW10IM8
    • CT6P42J7GRH50Y8
    • YW2B64F7V8DHJM5
  • 12 Nov 2025 10:50 AM (IST)

    12 Nov 2025 10:50 AM (IST)

    दिल्लीत झालेल्या स्फोटाबाबत महत्त्वपूर्ण माहिती समोर

    राजधानी दिल्लीत लाल किल्ल्याजवळ कारमध्ये भीषण स्फोट  झाला. या स्फोटाने संपूर्ण राजधानी हादरली आहे. अवघ्या काही मिनिटांत घडलेल्या घटनांमुळे तपास यंत्रणांनाही धक्का बसला आहे. दिल्ली पोलिस आणि सुरक्षा यंत्रणांकडून विविध शक्यता लक्षात घेता तपास केला जात आहे. या स्फोटात अमोनियम नायट्रेट, इंधन तेल आणि डिटोनेटर कार वापरल्याचे म्हटले जात आहे. त्यानुसार, प्रयत्न केले जात आहेत.

  • 12 Nov 2025 10:40 AM (IST)

    12 Nov 2025 10:40 AM (IST)

    Bihar Assembly Election 2025: मतदानानंतर आता मतमोजणीची तयारी

    बिहार विधानसभा निवडणुकीतील दुसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर १४ नोव्हेंबरला बिहारची राजधानी पटनासह राज्यातील ४६ मतमोजणी केंद्रांवर मतमोजणी होणार आहे. सर्व मतमोजणी केंद्रांजवळील स्ट्राँग रूममध्ये कडक त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. संबंधित सर्व जिल्ह्यांमधील मतमोजणी केंद्रे आणि स्ट्राँग रूमवर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे वापरले जात आहेत, अशी माहिती बिहारचे मुख्य निवडणूक अधिकारी विनोद सिंग गुंज्याल यांनी दिली आहे.

  • 12 Nov 2025 10:30 AM (IST)

    12 Nov 2025 10:30 AM (IST)

    राजकीय नेत्याने केली मतांची मागणी, आजोबांनी झोळीत टाकला 1 रुपया

    व्हिडिओमध्ये नेता त्याच्या काही कार्यकर्त्यांसोबत स्टेजवर उभा असतो. तो भाषण करतो आणि मग आपली झोळी पसरून समोर उपस्थित असलेल्या लोकांकडे मतांची भीक मागतो. मतांसाठी त्याने केलेली ही पद्धत पुढे जाऊन त्याच्यावरच उलटते आणि एक वृद्ध व्यक्ती त्याच्या झोळीत येऊन 1 रुपयांचं नाणं आणून टाकतो. वृद्ध व्यक्तीची ही कृती सर्वांनाच थक्क करते आणि त्याचवेळी चेहऱ्यावर हसूही आणते. नेत्याची किंमत 1 रुपयांमध्ये मोजली गेली हे पाहून त्याला राग अनावर झाला आणि ते झोळीत टाकलेले हे नाणे लगेच फेकून दिले. ही सर्व घटना तेथील एका व्यक्तीने आपल्या फोनच्या कॅमेरात कैद केली आणि लगेच याचा व्हिडिओ इंटरनेटवर शेअर करण्यात आला. घटनेतील ही दृश्ये पाहून फक्त युजर्सनाच नाही तर तिथे उपस्थित असलेल्या सर्वांनाच हसू फुटलं.

  • 12 Nov 2025 10:25 AM (IST)

    12 Nov 2025 10:25 AM (IST)

    ट्रम्पच्या निर्बंधांमुळे भारताचा मोठा निर्णय!

     जागतिक पातळीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियन तेल कंपन्यांवर घातलेल्या नव्या निर्बंधांचा परिणाम आता स्पष्टपणे दिसू लागला आहे. विशेष म्हणजे, या निर्बंधांचा परिणाम थेट भारतावर झाला असून, भारताने रशियाकडून होणारी स्वस्त कच्च्या तेलाची खरेदी मोठ्या प्रमाणात कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे तेल बाजारात खळबळ उडाली आहे.

  • 12 Nov 2025 10:20 AM (IST)

    12 Nov 2025 10:20 AM (IST)

    लिव्ह-इन पार्टनरसोबत वाद, ४५ वर्षीय युवकाने घेतला स्वतःचा जीव

    राजस्थान येथील श्रीगंगानगर येथून एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. एका ४५ वर्षीय युवकाने कारमध्ये पेट्रोल टाकून स्वतःला पेटवून घेतले आहे. त्यावेळी गाडीतून मोठा आवाज आला. तो ऐकून आजूबाजूचे लोक धावले, परंतु युवकाचा मृत्यू झाला होता. मृतक युवकाचा नाव सुरजित असे आहे. युवक हरियाणातील असल्याचा समोर आले आहे. त्याचे लिव्ह इन पार्टनरसोबत मोठा वाद झाला होता आणि त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे.

  • 12 Nov 2025 10:11 AM (IST)

    12 Nov 2025 10:11 AM (IST)

    चीन आणि तिबेटला जोडणारा ‘Hongqi Bridge’ पडल्यानंतर बनला जगभरात चर्चेचा विषय

    चीनच्या( china) सिचुआन प्रांतात नुकताच बांधलेला होंगकी पूल (Hongqi Bridge) मंगळवारी अचानक कोसळल्याने संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. हा पूल चीनच्या मध्यभागाला तिबेटशी( Tibet) जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचा एक महत्त्वाचा भाग होता. या अपघातामुळे तिबेटशी रस्ते संपर्क पूर्णपणे खंडित झाला असून वाहतूक सेवा ठप्प झाल्या आहेत. सुदैवाने, या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे समोर आलेले नाही.

  • 12 Nov 2025 09:59 AM (IST)

    12 Nov 2025 09:59 AM (IST)

    सोनं पुन्हा चमकलं, चांदीनंही मारली झेप!

    भारतात 12 नोव्हेंबर रोजी 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 12,585 रुपये, 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 11,536 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 9,439 रुपये आहे. भारतात 12 नोव्हेंबर रोजी 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,15,360 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,25,850 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 94,390 रुपये आहे. भारतात 12 नोव्हेंबर रोजी चांदीचा भाव प्रति ग्रॅम 160.10 रुपये आणि प्रति किलोग्रॅम 1,60,100 रुपये आहे.

  • 12 Nov 2025 09:50 AM (IST)

    12 Nov 2025 09:50 AM (IST)

    बांगलदेशात निवडणुकीपूर्वी मोठा गोंधळ

    Bangladesh news in Marathi : ढाका : बांगलादेशात (Bangladesh) पुन्हा एकदा मोठा गोंधळ सुरु झाला आहे. शेख हसीनानंतर (Sheikh Hasina) आता युनूसविरोधात लोक रस्त्यावर उतरले आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. विद्यार्थी अंतरिम सरकारविरोधात निषेध करत आहे. या आंदोलनाने मोठे रुप घेतले आहे. यामुळे पोलिसांनी आंदोलकांवर वॉटर कॅनन आणि अश्रुधुरांचा वापर, लाठीचार्ज केला आहे.

  • 12 Nov 2025 09:40 AM (IST)

    12 Nov 2025 09:40 AM (IST)

    पुन्हा होणार ‘Operation Sindoor 2.0’?

    PM Modi CCS Meeting : राष्ट्रीय राजधानी दिल्ली पुन्हा एकदा भीतीच्या सावटाखाली आहे. सोमवारी( दि. 11 नोव्हेंबर 2025) झालेल्या कार बॉम्बस्फोटानंतर( Delhi Bomb Blast) देशभरात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. या घटनेनंतर केंद्र सरकारने तातडीने कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी (CCS) ची बैठक बोलावली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)  भूतानच्या दौऱ्यावर असून, ते परतल्यानंतर स्वतः या बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवणार आहेत. या बैठकीत स्फोटाच्या तपासाची सद्यस्थिती, सुरक्षा संस्थांचे अहवाल आणि भविष्यातील रणनीतीवर चर्चा अपेक्षित आहे.

  • 12 Nov 2025 09:30 AM (IST)

    12 Nov 2025 09:30 AM (IST)

    आयपीएल 2026 : जडेजा आणि सॅम करन राजस्थानकडे, संजू सॅमसन चेन्नईकडे?

    आयपीएल 2026 हंगामासाठीच्या रिटेन्शन प्रक्रियेची अंतिम मुदत जवळ येत असताना चाहत्यांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. बीसीसीआयकडून अद्याप रिटेन्शनची अधिकृत तारीख जाहीर झालेली नसली, तरी नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्याच्या अखेरीपर्यंत सर्व फ्रँचायझींनी आपली खेळाडूंची यादी सादर करावी लागेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

    दरम्यान, राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यातील मोठ्या डीलची चर्चा क्रिकेटविश्वात रंगली आहे. क्रिकबझच्या वृत्तानुसार, चेन्नईचे ऑलराऊंडर रविंद्र जडेजा आणि सॅम करन हे संजू सॅमसनच्या बदल्यात राजस्थान रॉयल्समध्ये जाणार असल्याचे सांगितले जात आहे.

  • 12 Nov 2025 09:25 AM (IST)

    12 Nov 2025 09:25 AM (IST)

    पीएम किसान योजनेच्या २१व्या हप्त्याबाबत आज निर्णयाची शक्यता 

    पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देशभरातील कोट्यवधी शेतकरी २१व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. ऑक्टोबर महिन्यात हा हप्ता जमा होण्याची अपेक्षा होती, मात्र नोव्हेंबरचा दुसरा आठवडा सुरू असूनही शेतकऱ्यांच्या खात्यात अद्याप पैसे जमा झालेले नाहीत. त्यामुळे “हप्ता कधी मिळणार?” असा प्रश्न शेतकऱ्यांकडून सातत्याने उपस्थित केला जात आहे.

    दरम्यान, आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक होणार असून या बैठकीत पीएम किसान योजनेच्या २१व्या हप्त्याबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळाच्या चर्चेनंतर हप्त्याच्या वितरणासंदर्भात अधिकृत घोषणा होऊ शकते, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

  • 12 Nov 2025 09:20 AM (IST)

    12 Nov 2025 09:20 AM (IST)

    शेअर बाजारात आज करा या स्टॉक्सची खरेदी, पैशांचा पाऊस पडेल

    जागतिक बाजारातील उत्साहवर्धक संकेतांमुळे आज १२ नोव्हेंबर रोजी, बुधवारी भारतीय शेअर बाजारातील बेंचमार्क निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी ५०, सकारात्मक पातळीवर उघडण्याची शक्यता आहे. गिफ्ट निफ्टीवरील ट्रेंड देखील भारतीय बेंचमार्क निर्देशांकासाठी गॅप-अप सुरुवात दर्शवितात. गिफ्ट निफ्टी २५,९६२ च्या आसपास व्यवहार करत होता, जो निफ्टी फ्युचर्सच्या मागील बंदपेक्षा जवळजवळ १५० अंकांचा प्रीमियम होता.

  • 12 Nov 2025 09:15 AM (IST)

    12 Nov 2025 09:15 AM (IST)

    तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील आरोपीचा भाजपमध्ये प्रवेश 

     राज्यातील गाजलेल्या तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील जामिनावर बाहेर असलेला आरोपी आणि माजी नगराध्यक्ष संतोष परमेश्वर याने भाजपमध्ये प्रवेश केला आहे. तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला. परमेश्वर पूर्वी अखंड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सदस्य असून त्याने तुळजापूर नगराध्यक्षपदाची जबाबदारीही सांभाळली होती. मात्र, ड्रग्ज प्रकरणात अटकेनंतर त्याचा राजकीय प्रवास थांबला होता. आता त्याच्या भाजप प्रवेशामुळे आगामी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नव्या राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

  • 12 Nov 2025 09:12 AM (IST)

    12 Nov 2025 09:12 AM (IST)

    धर्मेंद्र यांना रुग्णालयातून डिस्चार्ज; बॉबी देओलसोबत घरी परतले

     ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र यांच्या प्रकृतीबाबत चिंतेत असलेल्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. तब्येत सुधारल्याने त्यांना मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयातून बुधवारी सकाळी डिस्चार्ज देण्यात आला. धर्मेंद्र यांना त्यांचा धाकटा मुलगा आणि अभिनेता बॉबी देओल स्वतः रुग्णवाहिकेतून घरी घेऊन गेला. रुग्णालयाबाहेर मीडिया आणि चाहत्यांची मोठी गर्दी दिसली. धर्मेंद्र यांना घरी नेण्यात येत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर काही क्षणांतच व्हायरल झाला.

  • 12 Nov 2025 09:10 AM (IST)

    12 Nov 2025 09:10 AM (IST)

    ‘लाडकी बहीण’ योजनेत केवायसी अनिवार्य; अंतिम तारीख १८ नोव्हेंबर

    महाराष्ट्र सरकारची लोकप्रिय ‘लाडकी बहीण’ योजना आता अंतिम टप्प्यात पोहोचली असून योजनेचा पुढील लाभ घेण्यासाठी महिलांसाठी केवायसी (KYC) प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली आहे. या प्रक्रियेसाठी महिलांना ऑनलाइन माध्यमातून ई-केवायसी पूर्ण करावी लागणार आहे.

    महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी १८ सप्टेंबर रोजी या केवायसी प्रक्रियेची घोषणा करत पोर्टल सुरू केले होते. त्यानंतर दोन महिन्यांची मुदत देण्यात आली होती. आता ही अंतिम मुदत १८ नोव्हेंबर निश्चित करण्यात आली आहे.

  • 12 Nov 2025 09:05 AM (IST)

    12 Nov 2025 09:05 AM (IST)

    अभिनेता गोविंदा प्रकृती बिघडल्याने रुग्णालयात दाखल

    बॉलिवूडमधून आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ज्येष्ठ अभिनेता गोविंदा यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी (११ नोव्हेंबर) रात्री सुमारे आठ वाजण्याच्या सुमारास गोविंदांची तब्येत बिघडली. त्यानंतर त्यांना तात्काळ जुहू परिसरातील रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी त्यांच्यावर आवश्यक उपचार सुरू केले आहेत. गोविंदांच्या प्रकृतीबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र त्यांच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर त्यांच्या लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

  • 12 Nov 2025 08:55 AM (IST)

    12 Nov 2025 08:55 AM (IST)

    राज्यात कडाक्याची थंडी कायम; तापमानात २ ते ७ अंशांची घट

    उत्तरेकडील थंड वारे राज्याच्या दिशेने वाहत असल्याने महाराष्ट्रात थंडीची लाट कायम आहे. गेल्या २४ तासांत राज्यातील किमान तापमानात २ ते ७ अंशांची घट नोंदवण्यात आली असून कडाक्याची थंडी आणखी काही दिवस कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

    आज वातावरण मुख्यतः कोरडे राहणार असून उत्तरेकडील भागात थंडीचा जोर कायम राहील. तर दक्षिण महाराष्ट्रात किमान तापमानात किंचित वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, जळगाव, यवतमाळ आणि कोकण परिसरात धुक्यासह थंडीची तीव्रता जाणवत आहे. नागरिकांनी सकाळी व रात्री उबदार कपड्यांचा वापर करण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे.

  • 12 Nov 2025 08:50 AM (IST)

    12 Nov 2025 08:50 AM (IST)

    सांगलीत वाढदिवसाच्या दिवशी दलित महासंघ अध्यक्षाचा खून; आरोपीचाही मृत्यू

    ‘मुळशी पॅटर्न’ शैलीतील थरारक घटनेत सांगलीत एका नेत्याची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. वाढदिवस साजरा करत असताना दलित महासंघाच्या मोहिते गटाचे अध्यक्ष उत्तम मोहिते यांची रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगार शेख याने चाकूने हत्या केली.ही घटना समोर येताच परिसरात एकच खळबळ उडाली. हल्ल्यानंतर झालेल्या चकमकीत आरोपी शेखचाही मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. वाढदिवसाच्या उत्सवातच झालेल्या या दुर्दैवी घटनेमुळे सांगली जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे. पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरू केला असून हत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

  • 12 Nov 2025 08:46 AM (IST)

    12 Nov 2025 08:46 AM (IST)

    दिल्लीतील प्रदूषणामुळे मोठं संकट

    राजधानी दिल्लीत प्रदूषणाची समस्या गंभीर बनताना दिसत आहे. या प्रदूषणामुळे लहान मुलांसह गर्भवती महिला, ज्येष्ठांना धोका असल्याचे दिसून आले आहे. केंद्र सरकारने आरोग्य मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. केंद्र सरकारने मुले, गर्भवती महिला आणि वृद्धांना वायू प्रदूषणामुळे मोठा धोका असल्याचे सांगितले.

  • 12 Nov 2025 08:45 AM (IST)

    12 Nov 2025 08:45 AM (IST)

    राज्यभरातील सर्व शाळा 24 नोव्हेंबरला राहणार बंद

     शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी शिक्षकांसाठी सक्तीची करण्यात आली आहे. या टीईटी सक्तीविरोधात राज्यभरातील शाळा 24 नोव्हेंबरला बंद ठेवण्याचा इशारा शिक्षक संघटनांनी दिला आहे. या निर्णयाचा फटका राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना बसणार आहे.

Marathi Breaking news live updates- शिवसेना आमदार अपात्रतेचे प्रकरण अनेक महिन्यांपासून कोर्टात प्रलंबित आहे. यावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. असे असताना आता या प्रकरणासह धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. उद्धव ठाकरे गटाने दाखल केलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर बुधवारी (दि.१२) स्लॉट नंबर १९ वर सुनावणी होणार असल्याचे न्यायालयाने निश्चित केले.

 

 

Web Title: Marathi breaking news today live updates political national crime sports international weather reports business lifestyle entertainment breaking news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 12, 2025 | 08:44 AM

Topics:  

  • Maharashtra Breaking News update

संबंधित बातम्या

Top Marathi News Today Live: राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतींसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात
1

Top Marathi News Today Live: राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतींसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात

Top Marathi News Today: राज्यात थंडीला सुरूवात, पण पुढील २४ तास महत्त्वाचे
2

Top Marathi News Today: राज्यात थंडीला सुरूवात, पण पुढील २४ तास महत्त्वाचे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.