Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

MNS MVA Satyacha Morcha Update : राज ठाकरे सत्याच्या मोर्चासाठी लोकलने चर्चगेटला निघाले

Marathi breaking live marath- डीआरआयच्या अधिकाऱ्याला गुप्त माहिती मिळाली. याच माहितीच्या आधारे कोलंबोहून मुंबईत आलेल्या एका महिला प्रवाशाला विमानतळावर थांबवले.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Nov 01, 2025 | 06:58 PM
MNS MVA Satyacha Morcha Update : राज ठाकरे सत्याच्या मोर्चासाठी लोकलने चर्चगेटला निघाले
Follow Us
Close
Follow Us:

Marathi Breaking news live updates:   अमली पदार्थ तस्करीविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. महसूल गुप्तचर संचालनालय (DRI) मुंबई झोनल युनिटचे ४७ कोटींचं कोकेन जप्त केलं आहे. ही कारवाई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर करण्यात आली आहे. एका महिला प्रवाश्याकडून सुमारे 4.7 किलो कोकेन जप्त करण्यात आलं आहे. या कोकेनची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत अंदाजे 47 कोटी रुपये आहे.

 

 

The liveblog has ended.
  • 01 Nov 2025 06:44 PM (IST)

    01 Nov 2025 06:44 PM (IST)

    Pune News: पुण्यात गॅंगवॉर पेटले! कोंढव्यात थरार; आंदेकर-कोमकर टोळी वादात रिक्षाचालकाला कोयत्याने…

    Crime News: पुण्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. पुण्यातील कोंढवा परिसरात एका रिक्षाचालकाची हत्या झाली आहे. गॅंगवॉरच्या युद्धातून ही हत्या करण्यात आल्याचे म्हटले जात आहे. कोंढवा भागात रिक्षा चालकाची हत्या करण्यात आली आहे. या हत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. आंदेकर-कोमकर टोळीयुद्धातून हत्या झाल्याचे म्हटले जात आहे.

  • 01 Nov 2025 06:22 PM (IST)

    01 Nov 2025 06:22 PM (IST)

    न्यायव्यवस्था राज्यकर्त्यांच्या इशाऱ्यावर नाचते, 30 जूनपर्यंत शेतकऱ्यांना न्याय द्या, नाहीतर…; राजू शेट्टींचा इशारा


    नीरा
     : शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा, या मागणीसाठी गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या चर्चेनंतर शेतकरी नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी सरकारवर तीव्र शब्दात टीका केली आहे. न्यायव्यवस्था राज्यकर्त्यांच्या इशाऱ्यावर नाचते, असा हल्लाबाेल शेट्टी यांनी केला.

  • 01 Nov 2025 06:09 PM (IST)

    01 Nov 2025 06:09 PM (IST)

    Kokan News: कोकणातील शेतकऱ्यांसाठी आमदार जाधवांचा पुढाकार; मुख्यमंत्र्यांकडे केली ‘ही’ मागणी

    चिपळूण: अवकाळी पाऊस, वादळे आणि परतीच्या पावसामुळे कोकणातील शेतकऱ्यांच्या उदरनिवाहाचे एकमेव माध्यम असलेल्या भातपिकाचे प्रचंड नुकसान झाल्याने मराठवाडा, विदर्भासाठी दिलेल्या मदतीप्रमाणेच कोकणातील शेतकऱ्यांना मदत जाहीर करण्याची मागणी शिवसेना नेते, आमदार भास्कर जाधव यांनी राज्याचे मुखमंत्री यांच्यासह कृषी तसेच मदत व पुनर्वसन मंत्री यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

  • 01 Nov 2025 05:55 PM (IST)

    01 Nov 2025 05:55 PM (IST)

    30 जूनपर्यंत शेतकऱ्यांना न्याय द्या, नाहीतर…; राजू शेट्टींचा इशारा

    शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा, या मागणीसाठी गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या चर्चेनंतर शेतकरी नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी सरकारवर तीव्र शब्दात टीका केली आहे. न्यायव्यवस्था राज्यकर्त्यांच्या इशाऱ्यावर नाचते, असा हल्लाबाेल शेट्टी यांनी केला.

  • 01 Nov 2025 05:19 PM (IST)

    01 Nov 2025 05:19 PM (IST)

    रोहित आर्यासंदर्भात गिरीश ओक यांनी केला धक्कादायक खुलासा

    रोहित आर्य नावाच्या व्यक्तीने ऑडिशनसाठी बोलावलेल्या 17 लहान मुलांना ओलीस ठेवल्याची घटना 30 ऑक्टोबर रोजी पवई येथील RA स्टुडिओमध्ये घडली. काही सेलिब्रिटींनी त्याच्या स्टुडिओला भेटही दिली होती. या घटनेच्या दोनच दिवस आधीच मराठी अभिनेता आयुष संजीव आरए स्टुडिओमध्ये गेला होता. आता चौकशीतून समोर आलं आहे की रोहितला अनेक मराठी कलाकारांशी संपर्क साधून त्यांच्यासोबत चित्रपट करण्याची इच्छा होती. त्यामध्ये ज्येष्ठ अभिनेते गिरीश ओक यांचाही समावेश होता. याबद्दल अभिनेते गिरीश ओक यांनी हिंदुस्तान टाइम्सशी बोलाताना सांगितले की, “माझ्याबरोबर काही काळ काम केलेल्या एका व्यक्तीनं रोहित आर्यच्या वतीनं मला त्याच्या चित्रपटातील भूमिकेसाठी संपर्क केला होता.”

  • 01 Nov 2025 05:07 PM (IST)

    01 Nov 2025 05:07 PM (IST)

    15 नोव्हेंबर 2025 पासून नांदेडमध्ये ‘या’ 2 बहुप्रतिक्षित विमानसेवा सुरु होणार

    मराठवाड्याच्या हवाई संपर्काच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची पायरी गाठत, नांदेड-मुंबई आणि नांदेड-गोवा या बहुप्रतिक्षित विमानसेवा अखेर सुरू होत आहेत. अनेक महिन्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर या दोन्ही सेवांना मंजुरी मिळाली असून, १५ नोव्हेंबरपासून या दोन्ही मार्गांवर विमानांची नियमित उड्डाणे सुरू होणार आहेत.

  • 01 Nov 2025 04:50 PM (IST)

    01 Nov 2025 04:50 PM (IST)

    महाराष्ट्र केसरी सिकंदरच्या अटकेनं कुस्ती क्षेत्रावर परिणाम होण्याची शक्यता ?

    महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्राला हादरवुन टाकणारी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र केसरी, आंतरराष्ट्रीय पैलवान सिकंदर शेख याला पंजाबमध्ये अटक केल्याने महाराष्ट्राच्या कुस्तीक्षेत्रात खळबळ उडाली आहे. अवैध शस्त्र तस्करी प्रकरणात सिकंदर शेख याच्यावर पंजाब पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे. या कारवाईने पपला गुर्जर टोळीशी त्याचे कनेक्शनही उघड झाले आहे. सिकंदर शेख ला पंजाब पोलिसांच्या सीआयएने अटक केल्याने याचा मोठा परिणाम महाराष्ट्राच्या कुस्ती वरती होण्याची शक्यता निर्माण झाली त्याचं महाराष्ट्र कनेक्शन ही पुढे येण्याची शक्यता नाकारता येत नाही....

  • 01 Nov 2025 04:40 PM (IST)

    01 Nov 2025 04:40 PM (IST)

    पर्यावरणपूरक खरेदीसाठी ‘वेटिंग’; अकोल्यात १० महिन्यांत २७९७ ई-वाहने रस्त्यावर,

    इंधनाची सातत्याने होणारी दरवाढ आणि वाहनांच्या वाढत्या किमतीमुळे गत काही वर्षात इलेक्ट्रीक वाहनांच्या विक्रीत मोठी वाढ झाली आहे. अकोला जिल्ह्यात जानेवारी २०२५ ते ३१ ऑक्टोबर पर्यंत २७९७ ई वाहनांची नोंद करण्यात आली आहे. दिवाळी निमित्ताने दरवर्षी वाहन खरेदी होत असते. यावर्षी केंद्र सरकाराने दुचाकी आणि चारचाकी वाहन प्रकारामधील कमी क्षमतेच्या वाहनांवरील वस्तू आणि सेवा कर कपात करण्याचा निर्णय घेतला होता. अकोलाशहरातील जवळपास प्रत्येक वाहन विक्री केंद्रावर जीएसटी कपातीची माहिती दिली जात होती. याचा सकारात्मक परिणाम वाहन विक्रीवरही झालेला दिसतो. गत १० महिन्यात ई-वाहनांची मोठ्या प्रमाणात नोंदणी झाली आहे. शहरातील रस्त्यांवर इलेक्ट्रक वाहनांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यंदाच्या दिवाळीत वाहन खरेदीसाठी नागरिकांनी इलेट्रिक दुचाकींना अधिक पसंती दिली आहे.

  • 01 Nov 2025 04:30 PM (IST)

    01 Nov 2025 04:30 PM (IST)

    रूपाली पाटील आणि माधवी खंडाळकर दोघींवर गुन्हा दाखल

    रुपाली पाटील तिची बहीण आणि भाऊ माझ्याकडे आले आणि मला ओढत मारहाण केली. रक्त बंबाळ होईपर्यंत मला मारल आणि नंतर दबाव टाकून माझ्याकडून वीडियो बनवून घेतला असा आरोप खंडाळकर यांनी केला आहे. खंडाळकर यांनी रुपाली पाटील यांनी मला मारहाण करायला लावली. एकीकडे हा आरोप असताना दुसरीकडे रुपाली पाटील यांच्या बहिणीने खंडाळकर यांच्या भावाने अश्लील शिवीगाळ केली. मनाला लज्जा उत्पन्न होईल अस कृत्य केल्याचा आरोप केला आणि त्यानुसार खंडाळकर आणि त्यांच्या भावांवर पण गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • 01 Nov 2025 04:20 PM (IST)

    01 Nov 2025 04:20 PM (IST)

    मविआचा मोर्चा म्हणजे उद्याच्या पराभवाची तयारी, सुजय विखेंची टीका

    मुंबईत निवडणूक आयोगाच्या विरोधात मविआ, मनसे तसेच विरोधी पक्ष मिळून मुंबईत मोर्चा काढत आहे. या मोर्चासाठी विरोधकांकडून जोरदार तयारी सुरु असताना यावर भाजपचे माजी खासदार सुजय विखेंनी प्रतिक्रिया देत मविआवर जोरदार टीका केलीये... हा मोर्चा म्हणजे ते उद्याच्या पराभवाची तयारी करत आहे...मविआला आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये पराभव दिसत आहे, त्या पराभवानंतर काय बोलायचं याची तयारी या मोर्चाच्या माध्यमातून ते करत असल्याची खरमरीत टीका माजी खासदार सुजय विखे यांनी विरोधकांवर केली आहे. आज अहिल्यानगर जिल्हा रुग्णालयात एका कार्यक्रमाप्रसंगी माजी खासदार सुजय विखे शहराचे आमदार संग्राम जगताप हे उपस्थित होते यावेळी माजी खासदार सुजय विखे यांनी मनसे तसेच महाविकास आघाडीच्या आघाडी बाबत देखील भाष्य केले आहे तसेच जिल्ह्यात सुरू असलेल्या ऑपरेशन लोटस संदर्भात देखील त्यांनी लवकरच जिल्ह्यातील काही बडे नेते देखील महायुतीत त प्रवेश करतील असे सुतवाच केले आहे.

  • 01 Nov 2025 04:15 PM (IST)

    01 Nov 2025 04:15 PM (IST)

    पंचनाम्याची वाट न बघता सरसकट नुकसान भरपाई जाहीर करा !

    सिंधुदुर्ग जिल्ह्यात जवळपास साडेपाच महिने पाऊस सुरु असून सरकारने उशिरा का होईना पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. परंतु, मागील नुकसान भरपाई सरकारने दिलेली नाही. यावर्षी पीक विमा देखील सरकारने बंद केल्याने या नुकसानीत विम्याचे पैसे शेतकऱ्यांना मिळाले असते ते देखील मिळणार नाहीत. मात्र, सातत्याच्या पावसामुळे होणाऱ्या नुकसानीला शेतकरी मेटाकुटीस आला आहे. संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या भात, भुईमूग व इतर पिकांचे अतोनात नुकसान झाले असून पंचनाम्याची वाट न बघता सरकारने सरसकट नुकसान भरपाई जाहीर केली पाहिजे अशी मागणी माजी आमदार वैभव नाईक यांनी महायुती सरकारकडे केली आहे.

  • 01 Nov 2025 04:10 PM (IST)

    01 Nov 2025 04:10 PM (IST)

    कर्जत येथून निघालेल्या देवदर्शन बस ला इगतपुरी येथे अपघात.

    दहिवळी येथील नाही भाविक कर्जत शहरातून आज पहाटे निघाले होते. कर्जत मधल्या दहिवलीतून आज पहाटे देवदर्शनासाठी महिला शेगाव कडे जात असताना त्यानं ह्या बसला अपघात झाला.या महिला भाविक शेगाव आणि त्यानंतर पंढरपूर इथे दर्शन घेऊन हि बस परत येणार होती. मात्र दुर्दैवाने इगतपुरी इथे असा या बसचा रूट होता.या प्रवासी गाडीला इगतपुरी येथे गंभीर अपघात झाला.ह्या अपघातात ढाक येथील दत्ता ढाकवळ ह्या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. बस मध्ये २४ महिला असल्याची माहिती मिळालेली आहे.बस मधील इतर महिलांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांच्यावर उपचार सुरु असल्याची प्राथमिक माहिती समजत आहे.

  • 01 Nov 2025 04:05 PM (IST)

    01 Nov 2025 04:05 PM (IST)

    दापोली-दाभोळ मार्गावर ‘शिवाई ई-बस’ अचानक बंद पडली

    दाभोळ येथून दापोलीकडे येणारी ‘शिवाई ई-बस’ (क्र. MH49 BZ 8353) आज सायंकाळी प्रवासादरम्यान अचानक बंद पडल्याची घटना घडली. या बसने नुकतीच आपली तिसरी फेरी पूर्ण केली होती दाभोळ येथून संध्याकाळी ४ वाजता सुटलेली ही बस दापोली-जालगाव (सुतारकोंड) परिसरात अचानक बंद पडली. या बसमध्ये सुमारे २० प्रवासी होते. घटनेनंतर सर्व प्रवाशांना मागून येणाऱ्या दुसऱ्या दाभोळ बसमध्ये सुरक्षितरीत्या बसवून दापोली आगाराकडे पाठविण्यात आले.या ‘शिवाई ई-बसेस’चे नुकतेच दापोलीत लोकार्पण झाले होते. बस बंद पडल्याने प्रवाशांमध्ये काही काळ चिंता निर्माण झाली.

  • 01 Nov 2025 03:59 PM (IST)

    01 Nov 2025 03:59 PM (IST)

    सोळा खलाशांना वाचवणारा ठरला देवदूत

    खोल समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या बोटी अचानक आलेल्या वादळामध्ये बेपत्ता झाल्या असल्याच्या बातम्या सर्वत्र प्रसिद्धा झाल्या आहेत. यातील दोन बोटिंना जलसामाधी मिळाली आहे. तर बेपत्ता बोटिंपैकी अनेक बोटी किनाऱ्यावर परत आल्या आहेत. मात्र यातील दोन बोटी वादळामध्ये अडकून होत्या. तर यातील सोला खालाशी जीव मुठीत घेऊन आपला जीव वाचण्यासाठी देवाचा धावा करत होते. अशा वेळीस करंजा, नवापाडा येथील अतिश सादानंद कोळी या तरुणांने या खालाशांसाठी आपला जीव धोक्यात टाकून खोल समुद्रात जाऊन दोन मासेमारी बोटिंसह त्यावरील सोळा खलाशांचा जीव वाचवण्याचं साहसी कार्य केलं आहे.

  • 01 Nov 2025 03:58 PM (IST)

    01 Nov 2025 03:58 PM (IST)

    अभिनेत्री नंतर आता ‘या’मराठी अभिनेत्याचा मोठा खुलासा

    30 ऑक्टोबर रोजी पवई येथील RA स्टुडिओमध्ये धक्कादायक घटना घडली. रोहित आर्य नावाच्या व्यक्तीने ऑडिशनसाठी बोलावलेल्या 17 लहान मुलांना ओलीस ठेवलं. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचल्यावर त्याच्या जवळ फायर गन आढळली.

    सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा

  • 01 Nov 2025 03:46 PM (IST)

    01 Nov 2025 03:46 PM (IST)

    अकोल्यात १० महिन्यांत २७९७ ई-वाहने रस्त्यावर, विक्रीत दुप्पट वाढ!

    अकोला: इंधनाची सातत्याने होणारी दरवाढ आणि वाहनांच्या वाढत्या किमतीमुळे गत काही वर्षात इलेक्ट्रीक वाहनांच्या विक्रीत मोठी वाढ झाली आहे. अकोला जिल्ह्यात जानेवारी २०२५ ते ३१ ऑक्टोबर पर्यंत २७९७ ई वाहनांची नोंद करण्यात आली आहे.

    सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा

  • 01 Nov 2025 03:36 PM (IST)

    01 Nov 2025 03:36 PM (IST)

    आजपासून आधार कार्डच्या नियमात बदल

    आधार अपडेटसाठी रांगेत उभे राहण्याची गरज आता जवळजवळ नाहीशी झाली आहे. एका मोठ्या बदलाप्रमाणे, UIDAI ने नाव, पत्ता आणि मोबाईल नंबर अपडेट करण्याची परवानगी दिली आहे. हा बदल आज, १ नोव्हेंबरपासून लागू झाला. 

    सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा

  • 01 Nov 2025 03:29 PM (IST)

    01 Nov 2025 03:29 PM (IST)

    Vote Chori च्या मुद्द्यावरून राज ठाकरेंचा घणाघात

    निवडणूक आयोगाच्या “बेकायदेशीर आणि सदोष” कार्यपद्धतींवर प्रकाश टाकण्यासाठी महाराष्ट्रातील विरोधी पक्षांनी आज म्हणजेच १ नोव्हेंबर २०२५ रोजी मुंबईत मोठ्या संयुक्त सत्य मार्चचे आवाहन केले आहे. यावेळी महाविकास आघाडीची एकजूट दिसून आली.

    सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा

  • 01 Nov 2025 03:20 PM (IST)

    01 Nov 2025 03:20 PM (IST)

    चुलत भावानेच केली अल्पवयीन चुलत बहिणीवर अत्याचार

    गाझियाबाद येथून एक संतापजनक आणि धक्कदायक घटना समोर आली आहे. १७ वर्षीय चुलत भावाने आपल्या १७ वर्षीय चुलत बहिणीवर लैंगिक अत्याचार केला आहे. एवढेच नाही, तर पीडितेला छतावरून फेकून देण्यात आला आहे.

    सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा....

  • 01 Nov 2025 03:00 PM (IST)

    01 Nov 2025 03:00 PM (IST)

    अडीच वर्षांत एकही चित्रपट नाही, तरीही Aishwarya Rai करोडोंची मालकीन; वाढदिवशी जाणून घ्या तिची करिअर जर्नी!

    बॉलिवूडमधील सर्वात सुंदर अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आज १ नोव्हेंबरला तिचा 52 वा वाढदिवस साजरा करत आहे. ऐश्वर्याने १९९४ मध्ये मिस वर्ल्डचा किताब जिंकला आणि त्यानंतर चित्रपटांमध्येही धुमाकूळ घातला. त्यानंतर तिने १९९७ मध्ये मणिरत्नमच्या तमिळ चित्रपट “इरुवर” मधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. ‘और प्यार हो गया’ या चित्रपटातून या अभिनेत्रीने हिंदी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. तथापि, तिला तिसरा हिंदी चित्रपट “हम दिल दे चुके सनम” द्वारे प्रसिद्धी आणि ओळख मिळाली. “हम दिल दे चुके सनम” मुळे ऐश्वर्या हिंदी चित्रपटसृष्टीत रातोरात सुपरस्टार बनली. तिचा अभिनय, देखावा आणि निळे डोळे यांनी प्रेक्षकांना भुरळ घातली.आज ती केवळ अभिनयाचीच नाही तर फॅशन आणि जागतिक ब्रँडचीही राणी आहे.

  • 01 Nov 2025 02:55 PM (IST)

    01 Nov 2025 02:55 PM (IST)

    मिनी ट्रेन सुरु कधी होणार ? माथेरानला येणाऱ्या पर्यटकांचा हिरमोड

    पर्यटकांची लाडकी मिनीट्रेन नेरळ स्थानकातून माथेरानसाठी अद्याप सुरु झालेली नाही. दरवर्षी 15ऑक्टोबर रोजी मिनीट्रेनची नेरळ माथेरान नेरळ प्रवासी वाहतूक सुरु होते. या वर्षी या मार्गावरील नॅरोगेज मार्गावर दर्दी कोसळल्याने दुरुस्तीची कामे सुरु होती.मात्र आता नेरळ येथून माथेरानसाठी मालवाहू गाडी कोणत्याही अडथळ्याविना प्रवास केला आहे.त्यामुळे नेरळ माथेरान नेरळ मार्गावर प्रवासी वाहतूक सुरु होण्याची वाट सर्व पर्यट्क बघत आहेत. दरम्यान नॅरोगेज मार्ग प्रवासी वाहतूक करण्यासाठी तयार झाला असल्याने नेरळ माथेरान नेरळ मिनीट्रेन कधी सुरु होणार याबाबत मध्यरेल्वेकडून कधी निर्णय घेतला जाणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

  • 01 Nov 2025 02:50 PM (IST)

    01 Nov 2025 02:50 PM (IST)

    स्वानंदी आणि आधिराच्या चुडा विधींमध्ये घडणार अनपेक्षित प्रसंग, आनंदी वातावरणात घडला अपशकुन

    लोकप्रिय मालिका “वीण दोघांतली ही तुटेना” मध्ये सध्या लग्नाचं वातावरण आहे. राजवाडे आणि सरपोतदार कुटुंब एकत्र येऊन लग्नसोहळ्याचा आनंद घेत आहेत. आधिरा आणि स्वानंदीच्या चूडा विधीमुळे सगळीकडे सेलिब्रशनचा उत्साह आहे. मात्र, या आनंदात एक अनपेक्षित वळण येणार आहे, ज्यामुळे सर्वजण चकित होणार आहेत.

  • 01 Nov 2025 02:45 PM (IST)

    01 Nov 2025 02:45 PM (IST)

    नोव्हेंबर महिन्यात हे स्मार्टफोन्स ठोठावणार तुमचं दार, टेकप्रेमींसाठी असणार खास सरप्राईज!

    तुम्ही देखील नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर थोड थांबा, कारण नोव्हेंबर महिन्यात अनेक टेक कंपन्या त्यांचे नवीन स्मार्टफोन्स लाँच करणार आहेत. हे स्मार्टफोन्स बजेट रेंजपासून प्रिमियम रेंजपर्यंत असणार आहेत. या स्मार्टफोन्समध्ये Moto G67 Power 5G, Realme GT 8 Pro सह इतर अनेक स्मार्टफोन्सचा समावेश आहे. यामध्ये जबरदस्त फीचर्स देखील दिले जाणार आहेत. नोव्हेंबर महिन्यात कोणते स्मार्टफोन्स लाँच होणार, सविस्तर जाणून घेऊया.

  • 01 Nov 2025 02:40 PM (IST)

    01 Nov 2025 02:40 PM (IST)

    भारत-दक्षिण आफ्रिका सामना ड्रॉ होणार, अंतिम सामन्यात 60 कोटी रुपये पणाला! वाचा सविस्तर

    भारताच्या संघाने ऑस्ट्रेलियाला पराभूत करुन फायनलमध्ये प्रवेश केला आहे तर दक्षिण आफ्रिकेच्या संघाने इंग्लडला पराभूत करुन अंतिम फेरीमध्ये स्थान पक्के केले आहे. भारताच्या संघाला विश्वचषकाची ट्राॅफी जिंकण्यासाठी दक्षिण आफ्रिकेचे आव्हान असणार आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक २०२५ साठी पात्र ठरले आहेत. दक्षिण आफ्रिकेने सेमीफायनलमध्ये इंग्लंडला हरवले, तर भारताने सेमीफायनलमध्ये सात वेळा चॅम्पियन असलेल्या ऑस्ट्रेलियाला हरवून जेतेपदाच्या सामन्यात आपले स्थान निश्चित केले.

  • 01 Nov 2025 02:35 PM (IST)

    01 Nov 2025 02:35 PM (IST)

    जालन्यात शेतकरी मेटाकुटीला, परतीच्या पावसाची सरासरी 100 मि.मी. पेक्षा जास्त

    भोकरदन तालुक्यातील गतवर्षी पेक्षा १३३ मी मी पाऊस जास्त झाला असून सरासरीपेक्षा अधिक टक्के पाऊस जास्त पडला आहे. परतीच्या पावसाने हाती आलेले खरिपातील पीक हिरावून घेतले आहे. कापणी सुद्धा खोळंबली असली तरी उभी पीक आडवी झाली आहेत पंचनामे सुरू असले तरी प्रत्यक्षात किती मदत मिळेल याकडे शेतकरी वर्गाचे लक्ष लागून राहिले आहे. जिल्ह्यावर पावसाचे संकट कायम आहे.  परतीचा पाऊस लांबल्याने गुरुवारी देखील जालन्यातील भोकरदन शहरदार आणि परिसरात दुपारपासूनच पाऊस सुरू होता. दररोज अशीच पावसाची ढगांच्या गडगडाट सह वर्णी लागत आहे गेले काही दिवसात भोकरदन मध्ये परतीच्या पावसाची सरासरी १३३.२ मिमी पेक्षा जास्त नोंदवली गेली आहे तर केवळ जून ते ३० सप्टेंबर ५२७.७ मिमी नोंदविली गेली आहे.

  • 01 Nov 2025 02:30 PM (IST)

    01 Nov 2025 02:30 PM (IST)

    आंध्र प्रदेशच्या वेंकटेश्वर मंदिरात चेंगराचेंगरी; 9 भाविकांचा मृत्यू

    आंध्र प्रदेशमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. आंध्र प्रदेशच्या श्रीकाकुलम वेंकटेश्वर स्वामी मंदिरात चेंगराचेंगरीझाली आहे. या चेंगराचेंगरीत तब्बल 9 भाविकांचा मृत्यू झाला आहे.

  • 01 Nov 2025 02:25 PM (IST)

    01 Nov 2025 02:25 PM (IST)

    ‘सत्या’च्या मोर्चाविरोधात मूक आंदोलन, विरोधकांच्या मतचोरीच्या आंदोलनाला भाजपाचं प्रत्युत्तर

    विरोधकांच्या सत्याच्या मोर्चा विरोधात सत्ताधारी भाजपनेही दंड थोपाटले आहे. आज मुंबईत भाजपकडून ‘मुक आंदोलन’ आयोजित करण्यात आले आहे. गिरगाव चौपाटीवरील टिळक उद्यानासमोर हे आंदोलन होणार आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन यशस्वी होणार असल्याचे भाजपने स्पष्ट केलं आहे. महाविकास आघाडीच्या दुटप्पी धोरणांविरुद्ध असल्याचे स्पष्ट केले आहे.विरोधकांचा मोर्चा आणि भाजपचे आंदोलन या दोन्ही कार्यक्रमांमुळे मुंबईत राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. दोन्ही आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. वाहतुकीच्या दृष्टीनेही विशेष व्यवस्था करण्यात आली असून नागरिकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

  • 01 Nov 2025 02:20 PM (IST)

    01 Nov 2025 02:20 PM (IST)

    टांझानियात निवडणुकीनंतर भीषण हिंसाचार ; ५०० हून अधिक लोकांचा मृत्यू

    आफ्रिकन देश टांझानियामध्ये नुकत्याच सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या. पण या निवडणुकीनंतर देशभरात हिंसाचाराची आग उसळली होती. तणाव तीव्र वाढला होता, यामुळे संपूर्ण देशात कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. तसेच इंटरनेट सेवा बंद करण्यात आल्या आहेत. राष्ट्राध्यक्ष सामिया सुलुहू हसन यांच्यावर विरोधकांचा आरोप आहे की त्यांनी आपल्या राजकीय प्रतिस्पर्ध्यांना अन्याय्यपणे तुरुंगात डांबले, ज्यामुळे लोकांमध्ये संतापाची लाट उसळली. विरोधी पक्ष चाडेमा दावा केला आहे की, या संघर्षामध्ये ७०० लोकांचा बळी गेला आहे. देशातील अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणात जीवीतहानी झाली आहे. परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आहे.

  • 01 Nov 2025 02:19 PM (IST)

    01 Nov 2025 02:19 PM (IST)

    मविआ-मनसेच्या सत्याचा मोर्चाला सुरुवात

    काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, नसीम खान, सचिन सावंत, भाई जगताप मोर्चामध्ये सहभागी झाली असून मविआ-मनसेच्या सत्याचा मोर्चाला सुरुवात झाली आहे

  • 01 Nov 2025 02:19 PM (IST)

    01 Nov 2025 02:19 PM (IST)

    राज आणि उद्धव ठाकरे मोर्चासाठी फॅशन स्ट्रीट कडे रवाना

    मतदार यादीतील घोळांविरुद्ध मविआ मनसे च्या मोर्चाला अखेर सुरुवात झाली असून, उद्धव आणि राज ठाकरे एकत्र मोर्चासाठी फॅशन स्ट्रीटकडे निघाले आहेत. इतर नेते तिथे पोहचले असून, कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली आहे. परंतु, अद्यापही या मोर्चासाठी परवानगी मिळाली नाही आहे.

  • 01 Nov 2025 02:18 PM (IST)

    01 Nov 2025 02:18 PM (IST)

    पत्नीच्या विवाहबाह्य संबंधाच्या संशयातून पतीने उचलले टोकाचे पाऊल, ३५ वर्षीय तरुणाने पार्कमध्ये…

    उत्तरप्रदेश येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. पत्नीच्या विवाहबाह्य संबंधाच्या संशयातून पतीने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. ही घटना उत्तरप्रदेश येथील दिल्लीच्या मंगोलपुरी परिसरात एका पार्कमध्ये शुक्रवारी (31 ऑक्टोबर)ला घडली आहे. त्याने आत्मत्या करणाऱ्या आधी सुसाईड नोट लिहून ठेवली होती. त्याने आत्महत्या करण्याचं कारण लिहिलं होत.

  • 01 Nov 2025 02:05 PM (IST)

    01 Nov 2025 02:05 PM (IST)

    पुणे जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला भगदाड! ‘हे’ बडे नेते राष्ट्रवादीत प्रवेश करणार

    स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाआधीच जिल्ह्यात मोठा राजकीय भूकंप होणार असून पुणे जिल्हा काँग्रेस पक्षातील अनेक वरिष्ठ पदाधिकारी व तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. त्यामुळे एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या पुणे जिल्ह्यातून काँग्रेस पक्षाचा सफाया होणार असल्याचे चित्र आहे.

  • 01 Nov 2025 01:58 PM (IST)

    01 Nov 2025 01:58 PM (IST)

    टीम इंडिया अ संघात पुनरागमन केल्यानंतर, रिषभ पंतने दिला ग्रीन सिग्नल!

    भारतीय अ संघ सध्या दक्षिण आफ्रिका अ विरुद्ध मालिका खेळत आहे. या मालिकेमध्ये भारतीय संघाचे कर्णधारपद हे रिषभ पंतकडे सोपवण्यात आले होते. भारत विरुद्ध इंग्लड यांच्यामध्ये झालेल्या पाच सामन्याच्या कसोटी मालिकेमध्ये रिषभला गंभीर दुखापत झाली होती त्यामुळे तो भारतीय संघामध्ये मागील 2 महिन्यांपासून दुर होता. आता त्याने भारतीय अ संघामध्ये पुनरागमन केले आहे. भारतीय संघाचा स्टार यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्यास सज्ज आहे.

  • 01 Nov 2025 01:50 PM (IST)

    01 Nov 2025 01:50 PM (IST)

    टांझानियात निवडणुकीनंतर भीषण हिंसाचार ; ५०० हून अधिक लोकांचा मृत्यू

    आफ्रिकन देश टांझानियामध्ये नुकत्याच सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या. पण या निवडणुकीनंतर देशभरात हिंसाचाराची आग उसळली होती. तणाव तीव्र वाढला होता, यामुळे संपूर्ण देशात कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. तसेच इंटरनेट सेवा बंद करण्यात आल्या आहेत. राष्ट्राध्यक्ष सामिया सुलुहू हसन यांच्यावर विरोधकांचा आरोप आहे की त्यांनी आपल्या राजकीय प्रतिस्पर्ध्यांना अन्याय्यपणे तुरुंगात डांबले, ज्यामुळे लोकांमध्ये संतापाची लाट उसळली. विरोधी पक्ष चाडेमा दावा केला आहे की, या संघर्षामध्ये ७०० लोकांचा बळी गेला आहे.

  • 01 Nov 2025 01:45 PM (IST)

    01 Nov 2025 01:45 PM (IST)

    Ratnagiri : ‘व्हेल माशाच्या उलटीची 3 कोटींची तस्करी ; आरोपींना अटक

    रत्नागिरी MIDC परिसरात वन्यजीव संरक्षण कायद्याचे उल्लंघन करत व्हेल माशाच्या उलटीची तस्करी केल्याची घटना समोर आली आहे.  पोलीसांना याचा सुगावा लागताच तपासा दरम्यामन पोलीसांनी व्हेल माशाच्या उलटी जप्त केली. आंतरराष्ट्रीय बाजारात याची किंमत 3 कोटीपेक्षा जास्त असल्याचं समोर आलं आहे.  विक्रीसाठी आणलेली तब्बल 3 कोटी रुपयांहून अधिक किमतीची ‘व्हेल माशाची उलटी’ स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने जप्त केली आहे.

  • 01 Nov 2025 01:35 PM (IST)

    01 Nov 2025 01:35 PM (IST)

    ऑस्ट्रेलियाविरुद्ध लज्जास्पद कामगिरीनंतर टीम इंडिया तिसऱ्या सामन्यात कमबॅक करणार का? प्लेइंग 11 मध्ये बदल होणार

    पाच सामन्यांच्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया टी२० आंतरराष्ट्रीय मालिकेतील दुसरा सामना काल मेलबर्न क्रिकेट ग्राउंड (एमसीजी) येथे खेळला गेला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव केला. भारताने फक्त १२५ धावा केल्या होत्या आणि ऑस्ट्रेलियाने १४ व्या षटकात ६ गडी गमावत १२६ धावांचे लक्ष्य गाठले. जोश हेझलवूडने धोकादायक गोलंदाजी केली, ३ विकेट घेतल्या आणि त्याला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले. अभिषेक शर्माने ६८ धावांची खेळी केली. त्याला इतर फलंदाजांकडून साथ मिळाली नाही.

  • 01 Nov 2025 01:25 PM (IST)

    01 Nov 2025 01:25 PM (IST)

    एक वर्षानंतरही ‘लेडी सिंघम’ची क्रेझ कायम, रोहित शेट्टीच्या कॉप युनिव्हर्सचा नवा अध्याय सुरू

    गेलं वर्ष अ‍ॅक्शनने भरलेलं होतं, जेव्हा रोहित शेट्टीने प्रेक्षकांना आपल्या ऑल-स्टार कॉप युनिव्हर्समधील सर्वात जबरदस्त फिल्म ‘सिंघम अगेन’ दिली होती. पण सगळ्यात मोठा सरप्राईज होता. पहिल्यांदाच रोहित शेट्टीच्या कॉप युनिव्हर्समध्ये एका महिला पोलिस ऑफिसरची एंट्री ‘लेडी सिंघम’ शक्ती शेट्टी, जी दीपिका पदुकोणने साकारली. हे पात्र दमदार आणि मस्तीखोर होतं, ज्याने पुन्हा एकदा आपल्याला रोहित शेट्टीच्या दुसऱ्या सुपरहिट चित्रपटातील ‘मीनम्मा’ची आठवण करून दिली.

  • 01 Nov 2025 01:15 PM (IST)

    01 Nov 2025 01:15 PM (IST)

    स्वानंदी आणि आधिराच्या चुडा विधींमध्ये घडणार अनपेक्षित प्रसंग, आनंदी वातावरणात घडला अपशकुन

    लोकप्रिय मालिका “वीण दोघांतली ही तुटेना” मध्ये सध्या लग्नाचं वातावरण आहे. राजवाडे आणि सरपोतदार कुटुंब एकत्र येऊन लग्नसोहळ्याचा आनंद घेत आहेत. आधिरा आणि स्वानंदीच्या चूडा विधीमुळे सगळीकडे सेलिब्रशनचा उत्साह आहे. मात्र, या आनंदात एक अनपेक्षित वळण येणार आहे, ज्यामुळे सर्वजण चकित होणार आहेत.

  • 01 Nov 2025 01:05 PM (IST)

    01 Nov 2025 01:05 PM (IST)

    पुणे-नगर महामार्गावर तीन वाहनांचा भीषण अपघात; जखमींचा आकडाही आला समोर

    कोंढापुरी (ता. शिरुर) नजीक पुणे- नगर महार्गावर तीन वाहनांचा भीषण अपघात होऊन तब्बल सोळा प्रवासी गंभीर जखमी होऊन तीन वाहनाचे नुकसान झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी एम एच १४ सि डब्ल्यू ४१५५ या लग्झरी बस वाहनावरील चालक सचिन श्रीकिसन तायडे (वय ३२ रा. मंगळूर नवघरे ता. चिखली जि. बुलढाणा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत आशिष वसंतराव हिवराळे (वय ४१ रा. अचलपूर ता. अमरावती जि. अमरावती) यांनी फिर्याद दिली आहे.

  • 01 Nov 2025 01:00 PM (IST)

    01 Nov 2025 01:00 PM (IST)

    मुंबईत रोहित आर्यचा थरारक ‘किडनॅप ड्रामा’ संपला एन्काउंटरमध्ये

    मुंबईत पवईतल्या स्टूडियोमध्ये १७ मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्याचा एनकाऊंटर करण्यात आला. रोहित आर्या ने हा सगळा बनाव रचताना एक चित्रपट पाहून तशाच पद्धतीने कट आखला होता. त्याने लहान मुलांच्या अपहरणावर एक लघु पट बनवायच ठरवलं होत. त्यासाठी त्याने काही मुलांचे ऑडिशन पण घेतल्या होत्या. त्यातील १७ मुलं ही त्याने सेलेक्ट केली होती. त्याच मुलांना ओलीस ठेवून रोहित आर्या हा धमकी देत होता. अखेर त्याचा मुंबई पोलिसांनी एनकाउंटर करत द एंड केला.

  • 01 Nov 2025 12:50 PM (IST)

    01 Nov 2025 12:50 PM (IST)

    जमीन मालकाचा मज्जाव, 27 ऊसतोड कामगारांना बंद करून ठेवलं,

    पुण्याच्या दौंड तालुक्यातील राहू माधवनगर येथून एक संतापजनक आणि धक्कदायक बातमी समोर आली आहे. २७ ऊसतोड वेठबिगार कामगार व त्यांच्या कुटुंबियांना बंधनमुक्त करण्यात आल्याचे समोर आले आहे. या वेठबिगार कामगारांची सुटका यवत पोलीस आणि तहसीलदारांच्या माध्यमातून करण्यात आली आहे.

  • 01 Nov 2025 12:40 PM (IST)

    01 Nov 2025 12:40 PM (IST)

    तरुणाचा तलवारीने खून, पोरं बोलवली अन् ३० सेकंदांत…

    छत्रपती संभाजीनगर शहराच्या जुन्या भागातील शहाबाजार परिसरात शुक्रवारी सायंकाळी एका तरुणावर तलवारीसारख्या धारदार हत्याराने सपासप वार करून त्याची निर्घृण हत्या करण्यात आली. या थरारक घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तातडीने तपासचक्रे फिरवून पाचही आरोपींना ताब्यात घेतले आहे

  • 01 Nov 2025 12:25 PM (IST)

    01 Nov 2025 12:25 PM (IST)

    यवतमाळमध्ये भीषण अपघात,बापासह तीन बहिणींचा जागीच मृत्यू

    यवतमाळमधून भीषण अपघाताची धक्कदायक बातमी समोर आली आहे. या अपघातात वडिलांसह तीन बहिणींचा जागीच मृत्यू झाला आहे. वडील मुलीला वणी – घुग्गुस मार्गावर कार शिकवित होते. त्यादरम्यान झालेल्या अपघातात वडिलांसह तिन्ही बहिणींचा मृत्यू झाला आहे. यात एक मुलगी गंभीर जखमी आहे.

  • 01 Nov 2025 12:20 PM (IST)

    01 Nov 2025 12:20 PM (IST)

    ५ वर्षीय चुमुकलीवर बलात्कार, प्रकृती गंभीर; CCTV फुटेजच्या आधारे 12 वर्षीय अल्पवयीनाला अटक

    उत्तरप्रदेशमधून बलात्काराची एक धक्कदायक घटना समोर आली आहे. पाच वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार झाल्याचे समोर आले आहे. आरोपीने बलात्कार करून तिला गंभीर अवस्थेत सोडून पळ काढलं होत. CCTV फुटेजच्या आधारे 12 वर्षीय अल्पवयीनाला अटक करण्यात आली आहे.

  • 01 Nov 2025 12:12 PM (IST)

    01 Nov 2025 12:12 PM (IST)

    Mumbai Airport: मुंबई विमानतळावर मोठी कारवाई! DRI कडून 47 कोटींचं कोकेन जप्त

    अमली पदार्थ तस्करीविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. महसूल गुप्तचर संचालनालय (DRI) मुंबई झोनल युनिटचे ४७ कोटींचं कोकेन जप्त केलं आहे. ही कारवाई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर करण्यात आली आहे. एका महिला प्रवाश्याकडून सुमारे 4.7 किलो कोकेन जप्त करण्यात आलं आहे. या कोकेनची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत अंदाजे 47 कोटी रुपये आहे.

  • 01 Nov 2025 12:00 PM (IST)

    01 Nov 2025 12:00 PM (IST)

    पक्ष दालनांच्या दुरुस्तीचा घाट, आचारसंहिता लागण्यापूर्वी KDMC चा निधी

    आगामी महापालिका निवडणूक घेण्यासाठी कल्याण डोंबिवली पालिका सज्ज झाली असून निवडणुकीनंतर निवडून येणाऱ्या विविध पक्षांच्या लोकप्रतिनिधींच्या दालनांच्या दुरुस्तीचा घाट पालिकेतील बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी घातला आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिका मुख्यालयातील लोकप्रतिनिधींच्या कायर्यालयांसह पालिका अधिकारी व महत्वाच्या विभागाच्या कार्यालयांच्या दुरुस्तीसाठी बांधकाम विभागातील अभियात्यांसह पाहणी सुरू केली आहे.

  • 01 Nov 2025 11:50 AM (IST)

    01 Nov 2025 11:50 AM (IST)

    चित्रपट की वास्तव? मुंबईत रोहित आर्यचा थरारक ‘किडनॅप ड्रामा’ संपला एन्काउंटरमध्ये

    मुंबईत पवईतल्या स्टूडियोमध्ये १७ मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्याचा एनकाऊंटर करण्यात आला. रोहित आर्या ने हा सगळा बनाव रचताना एक चित्रपट पाहून तशाच पद्धतीने कट आखला होता. त्याने लहान मुलांच्या अपहरणावर एक लघु पट बनवायच ठरवलं होत. त्यासाठी त्याने काही मुलांचे ऑडिशन पण घेतल्या होत्या. त्यातील १७ मुलं ही त्याने सेलेक्ट केली होती. त्याच मुलांना ओलीस ठेवून रोहित आर्या हा धमकी देत होता. अखेर त्याचा मुंबई पोलिसांनी एनकाउंटर करत द एंड केला.

  • 01 Nov 2025 11:40 AM (IST)

    01 Nov 2025 11:40 AM (IST)

    Vaijapur: साडेतीन लाखांच्या लालसेवर माणुसकीचा विजय

    आजच्या स्वकेंद्रित जगात ‘माणुसकी’ आणि ‘प्रामाणिकपणा’ हे केवळ पुस्तकातील शब्द झाले आहेत की काय? असा प्रश्न पडत असतानाच, वैजापूर येथील एसटी बसस्थानकात एका सामान्य सुरक्षा रक्षकाने आपल्या कृतीतून हे मूल्य आजही जिवंत असल्याचे सिद्ध केले आहे. एसटी सुरक्षा रक्षक बी. आर. तडवी यांनी तब्बल साडेतीन लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने असलेली बेवारस बॅग तिच्या मूळ मालकाला परत करून अतुलनीय प्रामाणिकपणाचा आदर्श निर्माण केला आहे.

  • 01 Nov 2025 11:30 AM (IST)

    01 Nov 2025 11:30 AM (IST)

    Bigg Boss 19 Eviction : धक्कादायक! हा मजबूत स्पर्धक पडला बाहेर

    बिग बॉस १९” या रिअॅलिटी शोमध्ये एक धक्कादायक अपडेट समोर आला आहे. या वेळी कोणीही बाहेर जाणार नाही असे पूर्वी वृत्त होते. आता, असा दावा केला जात आहे की एका स्पर्धकाला प्रकृती अस्वास्थ्यामुळे बाहेर काढण्यात आले आहे. आठवण म्हणून, गौरव खन्ना, प्रणित मोरे, कुनिका सदानंद, फरहाना भट्ट, अमाल मलिक, शाहबाज बदेशा, तान्या मित्तल आणि नीलम गिरी यांना यावेळी नामांकन मिळाले होते.

  • 01 Nov 2025 11:20 AM (IST)

    01 Nov 2025 11:20 AM (IST)

    Starlink Update: स्टारलिंकमध्ये काम करण्यासाठी सुरु झाली हायरिंग

    एलन मस्कच्या मालकीच्या स्पेसएक्सची मालकीची उपकंपनी स्टारलिंकने भारतात हायरिंग सुरु केले आहे. कंपनीने बंगळुरु ऑफीससाठी LinkedIn वर अनेक पोस्ट शेअर केल्या आहेत. या पोस्टमध्ये सांगितलं जात आहे की, भारतात लवकरच सॅटेलाईट स्टारलिंक इंटरनेट सेवा सुरु होणार आहे आणि यासाठी कंपनीने हायरिंग सुरु केलं आहे. ही कंपनी भारतात लवकरच सॅटेलाइट कम्युनिकेशन (SatCom) ऑपरेशन लाँच करण्याची शक्यता आहे. यामुळे ग्रामीण आणि खेडेगावात देखील नेटवर्क पोहोचणार आहे. स्टारलिंकला जुलै महिन्यात इंडियन रेगुलेटरद्वारे मंजूरी देण्यात आली होती. स्टारलिंक भारतातील 9 शहरांत स्टेशन सेटअप करण्याची प्लॅनिंग करत आहे.

Web Title: Marathi breaking news today live updates political national international crime sports business entertainment weather reports breaking news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 01, 2025 | 09:13 AM

Topics:  

  • maharashtra breaking news

संबंधित बातम्या

Top Marathi News Today: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; मुख्यमंत्र्यांकडून शेतकरी कर्जमाफीची घोषणा
1

Top Marathi News Today: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; मुख्यमंत्र्यांकडून शेतकरी कर्जमाफीची घोषणा

Top Marathi News Today Live: भिवंडीत 65 वर्षीय महिलेवर अत्याचार करून दगडाने ठेचून हत्या
2

Top Marathi News Today Live: भिवंडीत 65 वर्षीय महिलेवर अत्याचार करून दगडाने ठेचून हत्या

Top Marathi News Today Live: तुर्कीत ६.१ रिश्टर स्केलचा भूकंप
3

Top Marathi News Today Live: तुर्कीत ६.१ रिश्टर स्केलचा भूकंप

Top Marathi News Today: मतदार यादीच्या SIR संदर्भात आज निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद
4

Top Marathi News Today: मतदार यादीच्या SIR संदर्भात आज निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.