मराठवाडा-विदर्भात रुग्णवाढ झाल्याने आणखी १५ दिवस तरी शाळा बंद ठेवण्याबाबत मंत्रिमंडळात चर्चा : आरोग्यमंत्री टोपेंची माहिती

सध्या घाबरून जाण्यासारखी स्थिती नाही, पण काळजी घेणे गरजेचे आहे. सतर्क (Alert) राहणे गरजेचे आहे. त्यामुळेच काही निर्णय सतर्क राहण्याच्या दृष्टीने घेण्यात आले आहेत. त्यानंतर निरीक्षण करुनच शाळेसंदर्भातील योग्य तो निर्णय घेण्यात येऊ शकेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

    मुंबई : राज्यांतील शाळांबाबत (Discussion About Schools In State) मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रदीर्घ चर्चा झाली. ग्रामीण भागातही रुग्णसंख्या वाढत आहे. आता मराठवाडा आणि विदर्भात देखील रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे आणखी १५ दिवस तरी शाळा बंद (School Closure) ठेवण्याबाबत चर्चा झाली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांनी दिली.

    घाबरून जाण्यासारखी स्थिती नाही

    ते म्हणाले की, सध्या घाबरून जाण्यासारखी स्थिती नाही, पण काळजी घेणे गरजेचे आहे. सतर्क (Alert) राहणे गरजेचे आहे. त्यामुळेच काही निर्णय सतर्क राहण्याच्या दृष्टीने घेण्यात आले आहेत. त्यानंतर निरीक्षण करुनच शाळेसंदर्भातील योग्य तो निर्णय घेण्यात येऊ शकेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. काही विद्यार्थ्यानी मुख्यमंत्र्याना पत्रे लिहून शाळा सुरू करण्याची मागणी (Demand Schools Starts Through Letter) केल्याचे वृत्त प्रसारीत झाले होते त्यानंतर याबाबत निर्णय घेण्यात आल्याचे ते म्हणाले.