A car accident occurred before the Samrudhi Highway started

समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला, तर दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. औरंगाबाद येथून समृद्धी महामार्गाने बुलडाण्याच्या दिशेने जात असताना हा अपघात झाला. अपघातात एका व्यावसायिकाला प्राण गमवावे लागले. मात्र समृद्धी महामार्ग सुरु होण्यापूर्वीच वाहतूक सुरु कशी झाली? हा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे(A car accident occurred before the Samrudhi Highway started).

    बुलडाणा : समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला, तर दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. औरंगाबाद येथून समृद्धी महामार्गाने बुलडाण्याच्या दिशेने जात असताना हा अपघात झाला. अपघातात एका व्यावसायिकाला प्राण गमवावे लागले. मात्र समृद्धी महामार्ग सुरु होण्यापूर्वीच वाहतूक सुरु कशी झाली? हा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे(A car accident occurred before the Samrudhi Highway started).

    रविवारी बुलडाणा जिल्ह्यातील काही व्यावसायिक औरंगाबाद येथून समृद्धी महामार्गाने मेहकरकडे परत येत होते. मेहकर येथील बळीराम खोकले (वय ४५ वर्ष), चंद्रकांत सीताराम साबळे (४३) व सुनील श्रीराम लिंबेकर (४५) हे कारमधून औरंगाबादहून समृध्दी मार्गाने मेहकरकडे जात होते. यावेळी वाटेत अचानक मुसळधार पाऊस सुरू झाला.

    तांदुळवाडी शिवारात भरधाव वेगात असलेल्या कारवरुन चालकाचं नियंत्रण सुटल्याची माहिती आहे. कार महामार्गावरील दुभाजकाच्या खड्ड्यात पलटून अपघात झाल्याचे उघडकीस आले आहे.या प्रकरणी चंदनझिरा ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

    समृद्धी महामार्ग सुरु होण्यापूर्वीच आता त्यावरुन वाहतूक सुरु असल्याने अपघात होण्यासही सुरुवात झाली आहे. मात्र अद्याप समृद्धी महामार्गाचे काम सुरु असतानाही यावरुन वाहतूक सुरु कशी झाली? असा सवाल आता या निमित्ताने उपस्थित होत आहे.