प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

‘पेरा इंडिया’ (प्रीमिनन्ट एज्युकेशन अँड रिसर्च असोसिएशन) या महाराष्ट्रातील खाजगी विद्यापीठांच्या संघटनेच्या माध्यमातून राज्यातील 14 खाजगी विद्यापीठांतील इंजिनिअरिंग, बायोइंजिनिअरिंग, (Engineering, Bio engineering) मरिन इंजिनिअरिंग, डिझाइन, फाईन आर्टस्, फुड टेक्नॉलॉजी, फार्मसी, व्यवस्थापन, शिक्षण, आर्किटेक्चर .....

    औरंगाबाद (Aurangabad). ‘पेरा इंडिया’ (प्रीमिनन्ट एज्युकेशन अँड रिसर्च असोसिएशन) या महाराष्ट्रातील खाजगी विद्यापीठांच्या संघटनेच्या माध्यमातून राज्यातील 14 खाजगी विद्यापीठांतील इंजिनिअरिंग, बायोइंजिनिअरिंग, (Engineering, Bioengineering) मरिन इंजिनिअरिंग, डिझाइन, फाईन आर्टस्, फुड टेक्नॉलॉजी, फार्मसी, व्यवस्थापन, शिक्षण, आर्किटेक्चर, लॉ आणि हॉटेल व्यवस्थापन या विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी (The pre-examination for the 2021-22 session) ऑनलाईन ‘पेरा सीईटी- २०२१’चा (Pera CET-2021) निर्णय जाहीर करण्यात आला आहे. (Pre-examination for vocational courses)

    2021-22 या सत्रासाठी ही पूर्वपरीक्षा 16 ते 18 जुलैदरम्यान ऑनलाईन होईल, अशी माहिती एमजीएम विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास सपकाळ, पेराचे अध्यक्ष डॉ. मंगेश कराड, सीईओ हनुमंत पवार आणि एमजीएम विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. आशिष गाडेकर यांनी एमजीएम विद्यापीठात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

    डॉ. सपकाळ म्हणाले, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे व विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी म्हणून केंद्र आणि राज्य सरकारांनी यंदा इयत्ता बारावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. तर, पदवी आणि पद्व्युत्तर अभ्यासक्रमासाठीचे प्रवेश पूर्वपरीक्षेच्या माध्यमातून दिले जाणार आहेत. विविध अभ्यासक्रमांसाठी शासकीय स्तरावर आणि खाजगी स्तरावर विविध पूर्वपरीक्षा आयोजित केल्या जातात. याच पार्श्वभूमीवर 2021-22 या सत्रासाठी इंजिनिअरिंग, बायोइंजिनिअरिंग, मरिन इंजिनिअरिंग, डिझाइन, फाईन आर्टस्, फुड टेक्नॉलॉजी, फार्मसी, व्यवस्थापन, शिक्षण, आर्किटेक्चर, लॉ आणि हॉटेल व्यवस्थापन या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी 16, 17 आणि 18 जुलै रोजी ऑनलाइन पेरा-सीईटीचे आयेाजन करण्याचा निर्णय खाजगी विद्यापीठांच्या पेरा संघटनेचे अध्यक्ष डॉ. मंगेश कराड यांच्या सूचनेनुसार घेण्यात आला आहे.

    ही पूर्वपरीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठ (पुणे), एमजीएम विद्यापीठ (औरंगाबाद) विश्वंकर्मा विद्यापीठ (पुणे), अजिंक्य डी.वाय. पाटील विद्यापीठ (पुणे), सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी (पुणे), डी.वाय.पाटील इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी (पुणे), स्पायसर ऍडव्हेंटिस्ट युनिव्हर्सिटी (पुणे), संदीप विद्यापीठ, (नाशिक), संजय घोडावत विद्यापीठ (कोल्हापूर), एमआयटी डब्ल्युपीयू युनिव्हर्सिटी (पुणे), डी.वाय. पाटील विद्यापीठ (पुणे) विजयभूमी युनिवर्सिटी (मुंबई), सोमय्या विद्यापीठ (मुंबई) या विद्यापीठांमधील विविध अभ्यासक्रमांना प्रवेश घेता येईल.

    पूर्वपरीक्षेसाठी विद्यार्थ्यांना www.peraindia.in या संकेतस्थळावर 10 जुलैपर्यंत अर्ज करता येईल. या परीक्षेचा निकाल २३ जुलै रोजी जाहीर करण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी www.peraindia.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहनही डॉ. विलास सपकाळ आणि डॉ. आशिष गाडेकर यांनी केले आहे.