Allegations of mixing water with petrol; Shocking type at Reliance petrol pump in Aurangabad

औरंगाबाद शहरातील सिडको परिसरातील एन सेवन परिसरात असलेल्या रिलायन्स पेट्रोल पंपावर ती पेट्रोलमध्ये पाणी मिक्स केले जात असल्याचा आरोप करत ग्राहकांनी येथे मोठा गोंधळ घातला(Allegations of mixing water with petrol; Shocking type at Reliance petrol pump in Aurangabad).  पेट्रोल पंप व्यवस्थापकाने पोलिसांना सूचना केल्याने सदरील पेट्रोल पंप परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे.

    औरंगाबाद : औरंगाबाद शहरातील सिडको परिसरातील एन सेवन परिसरात असलेल्या रिलायन्स पेट्रोल पंपावर ती पेट्रोलमध्ये पाणी मिक्स केले जात असल्याचा आरोप करत ग्राहकांनी येथे मोठा गोंधळ घातला(Allegations of mixing water with petrol; Shocking type at Reliance petrol pump in Aurangabad).  पेट्रोल पंप व्यवस्थापकाने पोलिसांना सूचना केल्याने सदरील पेट्रोल पंप परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे.

    या पेट्रोल पंपावर पेट्रोल टाकणार्‍या काही ग्राहकांनी आरोप केला की सदरील पेट्रोलमध्ये पाणी मिक्स येत असल्याने त्यांच्या दुचाकी बंद पडले असून. सदरील पेट्रोल पंप चालकाने पेट्रोलमध्ये पाणी मिक्स केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ खरात गट औरंगाबाद यांचे जिल्हाध्यक्ष मनीष नवराडे यांनी सदरील पेट्रोल पंप तपासणी करून सिल करण्याची मागणी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्याकडे केली आहे.

    सदरील पेट्रोल पंपावर ग्राहकांनी मोठा गोंधळ घातल्याने पोलिसांनी त्या ठिकाणी येऊन नागरिकांना शांत करून पोलीस ठाण्यामध्ये तक्रार देण्याचे आवाहन ग्राहकांना केले आहे. सदरील पेट्रोल पंप संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की आजच पेट्रोलचा टँकर आल्याने सदरील पेट्रोलमध्ये काही खराबी असेल तर सांगता येत नाही असा माध्यमांशी बोलताना ते म्हणाले आहे. नागरिकांनी मोठा गोंधळ निर्माण केल्याने पोलीस प्रशासनाने येऊन मध्यस्थी केल्याने सदरील गोंधळ थांबला असून अनेक जणांनी सदरील पेट्रोलपंप चालकाविरुद्ध तक्रार दाखल करणार असल्याचे नागरिकांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे.