केंद्र सरकारकडून औरंगाबादच्या ‘माझी स्मार्ट बसला’ प्रथम पुरस्कार; प्रवाश्यांसाठी राष्ट्रीय कॉमन मोबिलिटी कार्ड सुरू करण्याचा लवकरच प्रस्ताव

औरंगाबाद स्मार्ट सिटी बसने (Smart City Bus) अर्बन मोबिलिटी गटात (the Urban Mobility category) इंडिया स्मार्ट सिटी अ‍ॅवॉर्डस (आयएसएसी)-२०२० जिंकला आहे, अशी घोषणा भारत सरकारच्या शहरी विकास मंत्रालयाने (the Ministry of Urban Development Government of India) शुक्रवारी केली.

    औरंगाबाद (Aurangabad).  औरंगाबाद स्मार्ट सिटी बसने (Smart City Bus) अर्बन मोबिलिटी गटात (the Urban Mobility category) इंडिया स्मार्ट सिटी अ‍ॅवॉर्डस (आयएसएसी)-२०२० जिंकला आहे, अशी घोषणा भारत सरकारच्या शहरी विकास मंत्रालयाने (the Ministry of Urban Development Government of India) शुक्रवारी केली.

    अवासन व शहरी कामकाज मंत्रालयामार्फत अमृत, प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) आणि स्मार्ट सिटीज मिशनच्या 6व्या वर्धापन दिनानिमित्त अवासन व शहरी कामकाज विभागाचे मंत्री हरदीपसिंग पुरी, सचिव दुर्गा शंकर मिश्रा आणि स्मार्ट सिटीज मिशन संचालक कुणाल कुमार यांच्या उपस्थितीत कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.  औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (एएससीडीसीएल) चे मुख्य कार्यकारी अधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण शिंदे आणि उर्वरित स्मार्ट सिटी टीम  कार्यक्रमास विडिओ कॉन्फेरंसन्गच्या द्वारे सहभागी झाले.

    तत्कालीन युवा सेने नेते आणि विद्यमान मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते जानेवारी 2019 मध्ये माझी स्मार्ट बस प्रकल्पाचे लोकार्पण करण्यात आले होते. 100 बसेस सोबत स्मार्ट बस प्रकल्प 32 मार्गांवर पोहोचतो. पूर्ण क्षमतेमध्ये स्मार्ट सिटी बसेस एकाच दिवसात तब्बल 22,000 किलोमीटर नेटवर्क व्यापतात. आतापर्यंत स्मार्ट बसने एकूण 52 लाख किलोमीटर धावताना 87 लाखाहून अधिक प्रवाश्यांना सेवेचा लाभ दिला आहे.

     जास्तीत जास्त क्षमतेवर कार्यरत असताना स्मार्ट सिटी बसने एका दिवसात 15000 पर्यंत प्रवाश्याना सेवा दिली  आणि सर्व बसेस कार्यरत असल्यास ही संख्या 25000 पर्यंत वाढेल. कोविड -१९ साथीच्या आजारामुळे बससेवेला मोठा फटका बसला असला तरी औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (एएससीडीसीएल) आणि औरंगाबाद महानगरपालिकेने कोव्हीड रुग्णवाहिका म्हणून बसचा वापर केला. या कालावधीत, बसेसने आरोग्य कर्मचारी आणि कोविड रूग्णांची वाहतूक करून 4 लाख पेक्षा अधिक किलोमीटर व्यापले आहेत.

    नोव्हेंबरमध्ये कोविड -१९ लॉकडाउननंतर नवीन डिजिटल अवतार मध्ये बस सेवा पुन्हा सुरू करण्यात आली. ई-तिकिटिंग, प्रवाशांच्या सुविधेसाठी स्मार्ट कार्ड, बस ट्रॅकिंग मोबाइल अॅप अशा नवीन व आकर्षक योजना आणि सुविधांसह बससेवा सुरू करण्यात आली. शहरात १५० स्मार्ट बस थांबे आणि ४०० चिन्हांचे खांब बस सेवेला पूरक ठरणारे आहेत.

    माझी स्मार्ट बस सेवेचा लाभ घेण्यासाठी प्रवाश्यांसाठी राष्ट्रीय कॉमन मोबिलिटी कार्ड सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. या एका कार्डाद्वारे नागरिक वेगवेगळ्या सार्वजनिक वाहतूक सेवा वापरू शकतात.

    या पुरस्कार बद्दल बोलताना मनपा आयुक्त आणि प्रशासक अस्तिककुमार पांडेय यांनी स्मार्ट सिटी टीम चे अभिनंदन केले आणि यशस्वीतेसाठी सर्व भागधारकांच्या प्रयत्नांचे कौतुक केले. “स्मार्ट बससाठी पुरस्काराचे श्रेय औरंगाबादमधील नागरिकांनाच आहे. त्यांनी बस सेवेचा लाभ घ्यावा व स्मार्ट बसच्या डिजीटल सुविधा व योजनांचा लाभ घ्यावा असे मी आवाहन करतो,” श्री पांडेय म्हणाले.

    माझी स्मार्ट बस प्रकल्प मनपाचे माजी आयुक्त आणि एएससीडीसीएलचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी निपुण विनायक ह्यांचा प्रयत्नाने सुरु करण्यात आले होते. एएससीडीसीएलचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी पुष्कल शिवम, स्मार्ट सिटी बस विभागाचे मुख्य चालन व्यवस्थापक प्रशांत भुसारी, मुख्य चालन व्यवस्थापक राम पावनीकर, डेप्युटी मॅनेजर सिद्धार्थ बनसोड, विश्लेषक विशाल खिल्लारे, प्रोजेक्ट असोसिएट रुशिकेश इंगळे, सहाय्यक मॅनेजर (लेखा व प्रशासन) माणिक निला, सहाय्यक व्यवस्थापक विलास काटकर, माजी उप-व्यवस्थापक (चालन आणि देखभाल) ललित ओस्तवाल, माजी उपव्यवस्थापक (ऑपरेशन्स) एमआर खिल्लारे यांनी पहिल्या दिवसापासून माझी स्मार्ट बस प्रकल्पात काम केले आहे.