Being asked before buying a home! The type that happened in the case of lawyers in Aurangabad; A case of atrocity has been registered in the police station

घर खरेदी करण्यापूर्वी वकिलाला त्याची जात विचारल्याचा धक्कादायक प्रकार औरंगाबाद शहरातील चिकलठाणा भागात घडला आहे. जात पाहून घर देण्यास नकार देणाऱ्या व्यवसायिक विरोधात चिकलठाणा पोलिस ठाण्यात ॲट्रॉसिटी चा गुन्हा दाखल झाला आहे(Being asked before buying a home! The type that happened in the case of lawyers in Aurangabad; A case of atrocity has been registered in the police station).

    औरंगाबाद : घर खरेदी करण्यापूर्वी वकिलाला त्याची जात विचारल्याचा धक्कादायक प्रकार औरंगाबाद शहरातील चिकलठाणा भागात घडला आहे. जात पाहून घर देण्यास नकार देणाऱ्या व्यवसायिक विरोधात चिकलठाणा पोलिस ठाण्यात ॲट्रॉसिटी चा गुन्हा दाखल झाला आहे(Being asked before buying a home! The type that happened in the case of lawyers in Aurangabad; A case of atrocity has been registered in the police station).

    एड. महेंद्र गंडले हे ७ जानेवारी रोजी पत्नी, मुलांसह भाईश्री ग्रुपची भूमी विश्वबन येथील रो हाऊसची साइट बघण्यासाठी गेले. येथील रो हाऊस आवडल्यामुळे त्यांनी साइटवरील कर्मचाऱ्यांकडे विचारणा केली. यावेळी कर्मचाऱ्यांकडून आधी जात विचारण्यात आली. त्यांनी अनुसूचित जातीचे असल्याचे सांगताच या कुटुंबाला कर्मचाऱ्यांनी घर दाखवण्यास टाळाटाळ केली.

    त्यानंतर वकिलाने थेट पोलीस ठाणे गाठत गुन्हा दाखल केला आहे. धक्काच बसला, पण घर घेण्याची इच्छा असल्याने त्यांनी आपण अनुसूचित जातीचे असल्याचे सांगितले. त्यावर ‘तुमच्या जातीच्या लोकांना घर देता येणार नाही’, असे कर्मचाऱ्यांकडून थेट सांगण्यात आले.

    हा प्रकार घडल्यावर गंडले यांनी रो हाऊस तयार करणाऱ्या बिल्डरचे कार्यालय गाठून घराची चौकशी केली. तिथेही त्यांना जात विचारून घर नाकारण्यात आल्याचा आरोप गंडले यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीत केला आहे. त्यामुळे बिल्डर आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांविरोधात चिकलठाणा पोलीस ठाण्यात अॅट्रासिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    हे सुद्धा वाचा
    • 2022