Bogus patients admitted to Kovid Center, Aurangabad

कोविड केअर सेंटर चिकलठाना येथे ओरिजनल कोरोना पेशंट रिप्लेस प्रकार स्किम देऊन(पैसे देऊ म्हणून ) आणल्याचा प्रकार उघडकीस. 15 नोव्हेंबर रोजी औरंगाबाद शहरातील चिकलठाणा परिसरात असलेल्या कोविड सेंटरमध्ये बोगस रुग्ण दाखल केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे(Bogus patients admitted to Kovid Center, Aurangabad).

    औरंगाबाद : कोविड केअर सेंटर चिकलठाना येथे ओरिजनल कोरोना पेशंट रिप्लेस प्रकार स्किम देऊन(पैसे देऊ म्हणून ) आणल्याचा प्रकार उघडकीस.
    15 नोव्हेंबर रोजी औरंगाबाद शहरातील चिकलठाणा परिसरात असलेल्या कोविड सेंटरमध्ये बोगस रुग्ण दाखल केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे(Bogus patients admitted to Kovid Center, Aurangabad).

    औरंगाबाद शहरामध्ये खरे कोरोना रुग्ण बाजूला ठेवून पॉझिटिव्ह रुग्ण बाजूला ठेवून पॉझिटिव व्यक्ती बाजूला ठेवून इतर व्यक्तींना केले सेंटरला दाखल करण्यात आले. औरंगाबाद शहरातील सिद्धार्थ गार्डन येथे गार्डन बघण्यासाठी शहरातील दोन नागरिक गेले होते. त्या नागरिकांना मनपा कर्मचाऱ्यांनी चेक केले असता त्यातील दोन जण पॉझिटिव्ह निघाले. तपासणी अहवाल येईपर्यंत त्या दोघांना तेथे थांबण्याचे सांगितले.

    मात्र, ते रुग्ण तेथून निघून गेले हा प्रकार कर्मचाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी शक्कल लढवून जालना जिल्ह्यातून तळणी येथून दोन मुलांना बोलावून तुम्हास आम्ही दहा दहा हजार रुपये देतो दहा दिवस तिथे रहा खा प्या मजा करा काही अडचण आली तर आम्हाला फोन करा असे सांगून कोविड सेंटरला भरती केले.

    एका एनजीओमुळे हा सर्व प्रकार उघडकीस आला. याबाबत आरोग्य अधिकारी यांच्याशी चर्चा केली त्यांनी सुद्धा त्यांची तपासणी करून त्यांचा कोरोना अहवाल हा निगेटिव्ह आल्याचे सांगितले असून पुढील कारवाईसाठी अधिकाऱ्यांना फोन करून जे दोषी असतील त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल असे सांगितले .