स्मार्ट सिटीला प्रकल्पांची अंमलबजावणी त्वरित करण्याचे केंद्राचे निर्देष; औरंगाबाद महानगरपालिकेला 147 कोटी जमा करण्याचे आदेश 

या बैठकीला भारत सरकारच्या शहर विकास मंत्रालयाचे सचिव दुर्गा शंकर मिश्र, स्मार्ट सिटीज मिशनचे संचालक कुणाल कुमार, सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील नगर विकास विभागाचे प्रधान सचिव आणि सर्व स्मार्ट शहरांचे मुख्य कार्यकारी अधिकारी बैठकीस उपस्थित होते. या बैठकीत महाराष्ट्र नगरविकास प्रधान सचिव महेश पाठक, औरंगाबाद महानगरपालिका (मनपा) चे आयुक्त आणि प्रशासक आणि एएससीडीसीएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी आस्तिक कुमार पांडेय आणि एएससीडीसीएलचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण शिंदे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठकीत भाग घेतला.

    औरंगाबाद: भारत सरकारच्या शहर विकास मंत्रालयाने बुधवारी सर्व स्मार्ट सिटीजची आढावा बैठक आयोजित केली होती. त्यामध्ये औरंगाबाद स्मार्ट सिटीला स्थानिक स्वराज्य संस्थांकडून निधी भरण्याबाबत, स्मार्ट सिटीचा प्रकल्पानां गती देण्यासाठी आणि एकात्मिक कमांड अँड कंट्रोल सेंटर (आयसीसीसी) अँप्लिकेशनसह एमएसआय प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी सूचना करण्यात आल्या.

    या बैठकीला भारत सरकारच्या शहर विकास मंत्रालयाचे सचिव दुर्गा शंकर मिश्र, स्मार्ट सिटीज मिशनचे संचालक कुणाल कुमार, सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील नगर विकास विभागाचे प्रधान सचिव आणि सर्व स्मार्ट शहरांचे मुख्य कार्यकारी अधिकारी बैठकीस उपस्थित होते. या बैठकीत महाराष्ट्र नगरविकास प्रधान सचिव महेश पाठक, औरंगाबाद महानगरपालिका (मनपा) चे आयुक्त आणि प्रशासक आणि एएससीडीसीएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी आस्तिक कुमार पांडेय आणि एएससीडीसीएलचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण शिंदे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठकीत भाग घेतला.

    स्मार्ट सिटी प्रकल्पात केंद्र सरकार, राज्य सरकार आणि शहरी स्थानिक संस्था यांचे अनुक्रमे 50 टक्के, 25 टक्के आणि 25 टक्के योगदान आहे. औरंगाबाद महानगरपालिकेला स्मार्ट सिटी प्रकल्पात 147 कोटी रूपये जमा करावयाचे आहेत. मनपाचे योगदानाशिवाय केंद्र व राज्यातील उर्वरित निधी जाहीर केला जाणार नाही. भारत सरकारने औरंगाबाद महानगरपालिकेला हा निधी लवकरात लवकर देण्याच्या सूचना दिल्या आहेत. मनपा प्रशासक आणि एएससीडीसीएलच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी भारत सरकारला सांगितले की मनपा आपले योगदानचा पहिला हप्ता येत्या काही दिवसात औरंगाबाद स्मार्ट सिटीला द्यायला तयार आहे.

    आयसीसीसीच्या अँप्लिकेशनशिवाय मास्टर सिस्टम इंटिग्रेटर प्रकल्प चांगल्या पद्धतीने वापरता येणार नाही आणि म्हणूनच शहरांनी आयसीसीसी प्रकल्प लवकरात लवकर राबवायला हवा असा हि मुद्दा बैठकीत मांडला गेला . आयसीसीसी अँप्लिकेशन द्वारे सी सी टी वि कॅमेरा फीड, पर्यावरण सेन्सर आणि वाहन ट्रॅकिंग सिस्टम यासारख्या एमएसआय प्रकल्पाचे विविध घटक एकत्रित एका डॅशबोर्ड वर आण्यास मदद होईल. हे आपत्ती प्रतिसाद आणि घटनेच्या व्यवस्थापनात मदत करते आणि स्टॅंडर्ड ऑपरेटिंग प्रक्रिया निश्चित करते. एएससीडीसीएलच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणाले की, आयसीसीसीसाठी निविदा तयार आहे आणि लवकरात लवकर प्रसिद्ध करण्यात येईल.