Clouds in Marathwada! Red Alert in Aurangabad district; Shivna, Anjana, Terna river floods

परळी तालुक्यातील विविध गावांत पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. मांजरी नदीशेजारी तीन कुटुंबातील 15 जण पुरात अडकले. कळंबला पाण्याचा वेढा पडला आहे.बीड-अंबाजोगाई महामार्गावरील वाहतूक बंद झाली आहे.  182 मंडळात अतिवृष्टी झाल्याने  20 लाख हेक्टर पिकांचे नुकसान झाले आहे.

    औरंगाबाद : मराठवाड्यात मध्यरात्रीपासून मुसळधार पावसाने कहर केल्यामुळे अस्मानी संकट कोसळले(Heavy rain in Marathwada). गेल्या अनेक वर्षात झाला नाही इतका पाऊस कोसळल्याने विभागातील आठही जिल्ह्यात शेतांचे अक्षरश: तळे झाले आहे. पावसामुळे ठिकठिकाणी घरांची पडझड झाली.

    परळी तालुक्यातील विविध गावांत पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. मांजरी नदीशेजारी तीन कुटुंबातील 15 जण पुरात अडकले. कळंबला पाण्याचा वेढा पडला आहे.बीड-अंबाजोगाई महामार्गावरील वाहतूक बंद झाली आहे.  182 मंडळात अतिवृष्टी झाल्याने  20 लाख हेक्टर पिकांचे नुकसान झाले आहे.

    तसेच तलाव, धरणे ओव्हर फ्लो झाल्याने व नदीनाल्यांना आलेल्या पूरामुळे अनेक गावांचा संपर्क काही काळ तुटला होता. उस्मानाबाद, नांदेड जिल्ह्यात अनेक जण घरांवर अडकल्याची घटना घडली आहे. ऑगस्ट महिन्यात शेवटचे दोन दिवस तर सप्टेंबरच्या पहिल्या आणि आता शेवटच्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीने कहर केला आहे.

    शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले खरीप हंगामाचे पीक पुर्णत: वाहून गेले आहे. तर अनेक शेतांमध्ये तळे साचल्याने मका, कापूस, मूग, उडीद, सोयाबीनचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे.