औरंगाबाद शहराला चक्रीवादळाचा तडाखा, नागरिकांची नुकसान भरपाई देण्याची मागणी

अनेक नागरिकांच्या घरांची नुकसान झाले असून, शहरात रात्रीपासून पावसाला सुरुवात झाली असून सतत धार वाऱ्या वादळाचा फटका बसला आहे, मनपा आणि अग्निशामक चे पथक परिसरात पोहोचले असून मात्र या घटनेत कोणतीही प्रकारची जीवितहानी झाली नाही, ज्या नागरिकांचे नुकसान झाले त्यांनी नुकसानभरपाईची मागणी केली आहे.

    शहरातील नारळीबाग चक्रीवादळाचा फटका अनेक झाडे तोडली शंभर वर्षे जुने वडाचे झाड पडले विजेच्या तारा तुटल्या ,नागरिकांची नुकसानभरपाई देण्याची मागणी केली. मंगळवार 28 सप्टेंबर रोजी शहरातील नारळीबाग परिसरात चक्रीवादळाचा फटका बसला असून परिसरातील अनेक झाडे पडली आहे तर परिसरातील शंभर वर्षे जुने वडाचे झाड पडले असून, झाडांच्या काही फांद्या विजेच्या तारा वरती पडल्याने वीजपुरवठा खंडित झाला आहे.

    अनेक नागरिकांच्या घरांची नुकसान झाले असून, शहरात रात्रीपासून पावसाला सुरुवात झाली असून सतत धार वाऱ्या वादळाचा फटका बसला आहे, मनपा आणि अग्निशामक चे पथक परिसरात पोहोचले असून मात्र या घटनेत कोणतीही प्रकारची जीवितहानी झाली नाही, ज्या नागरिकांचे नुकसान झाले त्यांनी नुकसानभरपाईची मागणी केली आहे, काही ठिकाणी झाडे घरावर पडल्याने घराचे नुकसान झाले आहे, मनपाने अग्निशामक दलाच्या वतीने झाडे बाजूला करण्याचे काम सुरू आहेत.