औरंगाबादकरांची धोक्याची घंटा टळली,  ब्रिटनमधून आलेल्या ५ प्रवाशांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह

ब्रिटनमध्ये आढळलेला विषाणू अतिधोकादायक असल्यामुळे औरंगाबाद प्रशासनाने परदेशातून आलेल्या प्रवाशांचा शोध घेतला आहे. यामध्ये ७ प्रवासी हे ब्रिटनमधून आल्याचे समजले. य प्रावाशांना मनपाने शोधून त्यांचा कोरोना अहवाल काढला आहे.

औरंगाबाद : जगभरात मागील १० महिन्यांपासून कोरोनाने थैमान घातले आहे. आता ब्रिटनमध्ये कोरोनाचे नवे रुप आढळल्याने जगभरात पुन्हा कठोर निर्बंध प्रवाशांवर लावले आहेत. ब्रिटनहून आलेले औरंगाबादच्या ७ प्रवाशांचा मनपाने कोरोना टेस्ट केली होती. यातील सर्व प्रवाशांची चाचणी निगेटीव्ह आली आहे. परंतु आरटीपीसीआर तपासणीच्या अहवालाची प्रतीक्षा होती. ५ प्रवाशांच्या आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल उशीरा प्राप्त झाला आहे. या पाचही प्रवाशांचा आरटीपीसीआर अहवाल निगेटीव्ह आला आहे.

ब्रिटनमध्ये आढळलेला विषाणू अतिधोकादायक असल्यामुळे औरंगाबाद प्रशासनाने परदेशातून आलेल्या प्रवाशांचा शोध घेतला आहे. यामध्ये ७ प्रवासी हे ब्रिटनमधून आल्याचे समजले. य प्रावाशांना मनपाने शोधून त्यांचा कोरोना अहवाल काढला आहे. यातील ५ प्रवाशांचा अहवाल निगेटीव्ह आला आहे. तर उर्वरित २ जणांचा कोरोना अहवाल रात्री उशीरा प्राप्त होणार आहेत. या प्रवाशाला मनपाने क्वारंटाईन केले आहे. या प्रवाशांना कोरोनाची लागण झाली नसल्यामुळे औरंगाबादकरांची चिंता कमी झाली आहे.