ed

औरंगाबादमध्ये (Aurangabad) शहरातील उद्योजकांच्या मालमत्तांवर ईडीने छापे मारण्याची कारवाई (Ed Raid In Aurangabad) सुरु केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

    औरंगाबाद : राज्यात ईडीकडून(Enforcement Directorate) गेल्या काही दिवसांपासून धाडसत्र सुरु आहे. आज औरंगाबादमध्येही(Aurangabad) शहरातील उद्योजकांच्या मालमत्तांवर ईडीने छापे मारण्याची कारवाई (Ed Raid In Aurangabad) सुरु केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. दुपारी १२ वाजल्यापासून औरंगाबादमध्ये ईडीच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई हाती घेतली आहे. अजूनही ही कारवाई सुरु आहे. लवकरच यातील अधिक माहिती अधिकाऱ्यांकडून उघड केली जाईल.

    मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील विविध सात स्थळांवर ईडीच्या अधिकाऱ्यांनी छापे मारले आहेत. यात नक्षत्रवाडी परिसराचाही समावेश असल्याची माहिती हाती आली आहे. वक्फ बोर्ड जमिनीसंदर्भात ही धाड पडल्याची माहितीहाती आली आहे. मात्र कोणत्या दोन उद्योजकांविरोधात ही कारवाई सुरु आहे, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.