कोरोना लस घेतल्यानंतरही घाटीच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर कोरोना पॉझिटिव्ह

अधिष्ठाता यांनी वेळीच चांगल्या सुविधा उपलब्ध करून रूग्णालयाची सेवा नियमित केली असती तर कदाचित खाजगी रुग्णालयात उपचारासाठी जाण्याची वेळ आली नसती, घाटीत मराठवाड्यातील गरीब रुग्ण येतात त्यांना बेड कमी पडू नये यासाठी खाजगी रुग्णालयात दाखल झाले आहे, शहरातील नागरिकांना कोरोना केसेस मध्ये कोरोना सेंटर वर उपचार दिल्या जातात.

    औरंगाबाद : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा घाटी रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी कोरोना प्रतिबंधित लसचे दोन डोस घेतल्यानंतर ही त्यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आलेला आहे.ही बाब म्हणजे गंभीर स्वरूपाची आहे, अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी मोठेपणा दाखवत त्या एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले आहे.

    अधिष्ठाता यांनी वेळीच चांगल्या सुविधा उपलब्ध करून रूग्णालयाची सेवा नियमित केली असती तर कदाचित खाजगी रुग्णालयात उपचारासाठी जाण्याची वेळ आली नसती, घाटीत मराठवाड्यातील गरीब रुग्ण येतात त्यांना बेड कमी पडू नये यासाठी खाजगी रुग्णालयात दाखल झाले आहे, शहरातील नागरिकांना कोरोना केसेस मध्ये कोरोना सेंटर वर उपचार दिल्या जातात, मात्र अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांना व्ही आय पी ट्रिटमेंट हवी असल्याने खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत अशी ही चर्चा शहरात सुरू आहे, कोरोना लस घेतल्यानंतर सुध्दा ही काळजी घेणे आवश्यक आहे.

    कोरोना बाधितांच्या संपर्कात आल्यानंतर अहवाल पॉझिटिव्ह येवू शकते, मास्क वापरणे अत्यावश्यक आहे, लस सुरक्षित आहे पण आपली काळजी घेणे जरुरीचे आहे. घाटीतील अधिष्ठाता ह्या कोरोनाच्या वाढत असलेल्या रुग्णसंख्या व घाटीत दाखल होणाऱ्यांची रुग्णांची संख्या यामुळे काही दिवसांपासून नियोजनासाठी प्रयत्नशील होत्या अशातच त्या कोरोना पॉझिटिव्ह झाल्याने धक्काच बसला.

    घाटीच्या उपचारावर विश्वास नसल्याने खाजगी रुग्णालयात दाखल झाल्या अशी चर्चा शहरात जोरात सुरू आहे. दरम्यान अधिष्ठता डॉ. कानन येळीकर म्हणाल्या घाटीत अतिगंभीर रुग्णावर उपचार करण्यात येत आहे. ऑक्सिजनची ज्यांना गरज आहे असे रुग्ण येथे दाखल आहेत. मी जर घाटीत दाखल झाले असते तर एक बेड व्यर्थ गेला असता गोरगरीब रुग्णांना त्याचा फायदा व्हावा म्हणून मी खाजगी रुग्णालयात दाखल झाले आहे. अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांना या खऱ्या परिस्थिती बाबतीत जाणीव आहे हे नाकारता येत नाही.