इंधनाचे दर अमेरिका ठरविते त्यामुळे केंद्र सरकारला दोषी ठरवणे चुकीचे; केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे वक्तव्य

इंधनाचे दर हे अमेरिका ठरविते, त्यामुळे केंद्र सरकारला दोषी ठरवणे चुकीचे आहे, असे मत केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केले. वाढत्या इंधनदरांसाठी केंद्राला दोषी ठरवणे अयोग्य असल्याचे दानवे यांनी औरंगाबादमधील एका कार्यक्रमात सांगितले(Fuel prices are set by the US so it is wrong to blame the central government; Statement by Union Minister of State Raosaheb Danve).

    औरंगाबाद : इंधनाचे दर हे अमेरिका ठरविते, त्यामुळे केंद्र सरकारला दोषी ठरवणे चुकीचे आहे, असे मत केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केले. वाढत्या इंधनदरांसाठी केंद्राला दोषी ठरवणे अयोग्य असल्याचे दानवे यांनी औरंगाबादमधील एका कार्यक्रमात सांगितले(Fuel prices are set by the US so it is wrong to blame the central government; Statement by Union Minister of State Raosaheb Danve).

    केंद्र सरकारने याच महिन्याच्या सुरुवातीला इंधनावरील कर कमी केला होता अशी आठवण दानवे यांनी करून दिली. मात्र त्याचवेळी भाजपाची सत्ता नसणाऱ्या महाराष्ट्रासारख्या अनेक राज्यांनी व्हॅट कमी केलेला करून सर्वसामान्य ग्राहकांना दिलासा दिलेला नाही, असेही दानवे म्हणाले.

    इंधनाचे दर हे आंतरराष्ट्रीय स्तरावरील कच्च्या तेलाच्या किंमतीनुसार ठरवले जातात असा युक्तीवाद दानवेंनी केला. महाविकास आघाडीमधील घटक पक्षाचे नेते एकत्र येऊन चर्चा करून निर्णय घेत नाहीत, असा टोलाही दानवेंनी यावेळी लगावला.