Funding for skills development, women industry development and mentoring programs for small entrepreneurs; MLA Ambadas Danve's demand to Guardian Minister Subhash Desai

कौशल्य विकास, उद्योजकता विकास,महिला उद्योजक विकास आणि स्टार्टअपस् या क्षेत्रात भरीव कार्य पुर्ण क्षमतेने करत आहे. मसिआ या संघटनेने चिकलठाणा येथे सुसज्ज सभागृह समाविष्ट असलेली नवीन इमारत विकसीत करीत आहे. हे सभागृह उद्योग, संघटना, एनजीओ यांच्यासह शैक्षणिक संस्था व विद्यार्थ्याना उपयुक्त ठरणार आहे.

  औरंगाबाद : कौशल्य विकास महिला, उद्योग विकास व लघुउद्योजकांना मार्गदर्शन कार्यक्रम राबविण्यासाठी आवश्यक त्या सुविधेसह सभागृह विकसित करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात यावा अशी मागणी शिवसेना प्रवक्ते जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांनी महाराष्ट्र राज्य उद्योगमंत्री तथा पालकमंत्री सुभाष देसाई यांची भेट घेऊन केली आहे.

  याविषयी आमदार अंबादास दानवे यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की मराठवाडा असो.ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज अँड एग्रीकल्चर (मसीआ), औरंगाबाद ही संघटना मागील 43 वर्षापासुन औद्योगिक क्षेत्रात कार्यरत आहे.या संघटनेचे आजतागायत 1300 उद्योजक सदस्य आहेत.मराठवाड्याचा औद्योगिक विकास व्हावा यासाठी मसिआ अनेक उपक्रम राबवित असते.

  यामध्ये प्रामुख्याने सेमिनार- वेबिनार आयोजित करणे. इंडस्ट्री- ॲकॅडेमिक स्टुडन्टस प्रोजेक्ट राबवविणे, आयटीआय व अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या सहभागाने कौशल्या विकास उपक्रम राबविणे ,एमएसएमई इन्नोव्हेशन फॉसिलिटेशन सेल मार्फत उद्योजकांना विकसीत होण्यासाठी मदत करणे. लिन मॅन्युफॅक्चरींग क्लस्टर अशा एकुण 12 क्लस्टरची स्थापना करुन त्यातून 125 सदस्यांना फायदा मिळवुन देण्यात आला. औद्योगिक प्रदर्शन भरविणे आणि जर्मन संस्था – जिआयझेड सहकार्याने रेडी इंजिनिअर उपक्रम रबविणे यासाठी उपयुक्त सुविधा असलेल्या सभागृहाची आवश्यकता आहे.

  सदरील संस्था मराठवाड्यातील शैक्षणिक संस्थेशी संलग्न होऊन मराठवाड्यात काम करीत आहे.या संस्थेने मराठवाड्यातील अनेक संस्थामधील विद्यार्थ्यांसाठी विविध विषयावरील प्रशिक्षण शिबीर नियमीत आयोजित केले आहे. या माध्यमातुन नव तरुणांना रोजगाराची तर उद्योजकांना आवश्यक ते मनुष्यबळ मिळण्याचे संधी मिळत आहे.

  कौशल्य विकास, उद्योजकता विकास,महिला उद्योजक विकास आणि स्टार्टअपस् या क्षेत्रात भरीव कार्य पुर्ण क्षमतेने करत आहे. मसिआ या संघटनेने चिकलठाणा येथे सुसज्ज सभागृह समाविष्ट असलेली नवीन इमारत विकसीत करीत आहे. हे सभागृह उद्योग, संघटना, एनजीओ यांच्यासह शैक्षणिक संस्था व विद्यार्थ्याना उपयुक्त ठरणार आहे.

  मसिआ संघटनेने देणगी जमा करुन आतापर्यत इमारतीच्या तळमजल्यावरील सभागृहाचे बांधकाम पुर्ण केले आहे.या कामासाठी अंदाजे रु.2.50 कोटी सदरील संघटनेने खर्च केले आहे. मसिआ ही एक सार्वजनिक विश्वस्त संस्था असल्याने त्यांचे उत्पन्नाचे स्त्रोत ही सीमित आहेत . त्यामुळे त्यांच्या या उर्वरीत कामासाठी अंदाजे रु.7.00 कोटी खर्च अपेक्षित आहे.  सदरील संघटनेचा उद्देश लक्षात घेऊन उर्वरित कामासाठी 7.00 कोटी रुपये निधी मंजुर करण्यात यावा अशी मागणी आमदार अंबादास दानवे यांनी केले.