दुर्बिणद्वारे शस्त्रक्रिया करताना डॉक्टरला हृदयविकाराचा झटका, आरोग्य क्षेत्रात हळहळ व्यक्त

औरंगाबादमधल्या एका खासगी रुग्णालयात डॉक्टर दिग्विजय शिंदे प्रॅक्टिस करत होते. दुर्बिणद्वारे शस्त्रक्रिया करत असताना त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि त्याच्यात त्यांचा मृत्यू झाला. मूळचे इटखेडा येथील डॉ. दिग्विजय शिंदे हे एक फिजिशियन इंटेंसिविस्ट होते.

    औरंगाबाद : शस्त्रक्रिया करत असताना डॉक्टरला हृदयविकाराचा झटका आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही घटना औरंगाबाद मध्ये घडली आहे. दुर्बिणद्वारे शस्त्रक्रिया करत असताना एका तरूण डॉक्टराला हृदयविकाराचा झटका आला. परंतु या कारणामुळे तरूण डॉक्टरचा दुर्देैवीपणे मृत्यू झाला आहे. तसेच या घटनेमुळे आरोग्य क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.

    दुर्बिणद्वारे शस्त्रक्रिया करत असताना त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका

    औरंगाबादमधल्या एका खासगी रुग्णालयात डॉक्टर दिग्विजय शिंदे प्रॅक्टिस करत होते. दुर्बिणद्वारे शस्त्रक्रिया करत असताना त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि त्याच्यात त्यांचा मृत्यू झाला. मूळचे इटखेडा येथील डॉ. दिग्विजय शिंदे हे एक फिजिशियन इंटेंसिविस्ट होते. औरंगाबादेतील स्टेशन रोडवरील खासगी रुग्णालय जीआय वन हॉस्पिटलमध्ये डॉ. शिंदे एका रुग्णाची छोटी झालेली अन्ननलिका मोठी करण्याची शस्त्रक्रिया करत होते. या शस्त्रक्रियेवेळी त्यांच्यांसोबत इतर डॉक्टर देखील उपस्थित होते.

    डॉक्टरांनी तात्काळ त्यांच्यावर उपचार केले. मात्र…

    शस्त्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दुर्बिणीतून पाहत असताना डॉक्टरांना अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यानंतर उपस्थित डॉक्टरांनी तात्काळ त्यांच्यावर उपचार केले. मात्र त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनं सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.