औरंगाबादकरांनो पाणीपट्टी कर भरलात ना? नाहीतर….

शहरासाठी आवश्यक असलेले पाणी जायकवाडी धरणातून घेण्यासाठी महपालिकेला जलसंपदा विभागात पाणीपट्टी भरावी लागते. परंतु, पालिकेने नोव्हेंबर २०१५ पासून पाणीपट्टी भरली नाही. त्यामुळे पाणीपट्टीच्या थकबाकीची रक्कम २६ कोटी ३२ लाख २३ हजार रुपये झाली आहे.

    औरंगाबाद : मनपाने थकबाकी न भरल्यामुळे औरंगाबाद शहराला होणारा पाणीपुरवठा (Water Suppy) बंद करण्यात येणार असल्याची माहिती जायकवाडी पाटबंधारे विभागाचे विभागीय अभियंता दीपक डोंगरे यांनी सदरील माहिती आज (18 फेब्रुवारी) दिली.

    यासंदर्भात मनपाने शहरातील नागरिकांना पाणीपट्टी भरण्याचे आवाहन करण्यात आले असून, ज्यांनी नळ कनेक्शन आणि पाणीपट्टी कर भरले नाही त्यांची नळ कनेक्शन कट करण्यात येणार असल्याची माहिती मनपाने दिली आहे. २१ फेब्रुवारीपासून टप्प्याटप्प्याने पाणीपुरवठा बंद केला जाईल आणि २५ फेब्रुवारीपासून पाणीपुरवठा पूर्णपणे बंद केला जाईल, असे जलसंपदा विभागाने महापालिकेला पाठवलेल्या नोटिसमध्ये म्हटले असून, जलसंपदा विभागाने थकीत पाणीपट्टीबद्दल महापालिकेला नोटीस पाठवून पाणीपट्टी न भरल्यास २५ फेब्रुवारीपासून जायकवाडी धरणातील पाणीउपसा बंद करण्यात येईल, असा इशारा दिला आहे. तर मनपाने सांगितले की ‘शहराचा पाणीपुरवठा बंद होऊ दिला जाणार नाही. थकबाकीपैकी काही रक्कम जमा केली जाईल,’ असे पत्रकारांशी बोलताना पालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी सांगितले.औरंगाबाद शहराला जायकवाडी धरणातून पाणीपुरवठा केला जातो. ही थकबाकी त्वरित न भरल्यास २१ फेब्रुवारीपासून टप्प्याटप्प्याने पाणीपुरवठा बंद केला जाईल आणि २५ फेब्रुवारीपासून पाणीपुरवठा पूर्णपणे बंद केला जाईल, असे जलसंपदा विभागाने महापालिकेला पाठवलेल्या नोटिशीमध्ये म्हटले आहे. औरंगाबाद शहराचा पाणीपुरवठा कोणत्याही परिस्थितीत बंद होऊ दिला जाणार नाही. थकबाकीच्या रकमेपैकी काही रक्कम महापालिका जलसंपदा विभागाला भरेल. मी उधारी चुकती करणारा आयुक्त आहे. आस्तिककुमार पांडेय, प्रशासक, औरंगाबाद महापालिका असे म्हणाले आहे.तर जलसंपदा चे उपविभागीय अभियंता दिपक डुंबरे यांनी माहिती देताना सांगितले की मनपाने तर बाकी न भरल्यास औरंगाबाद शहराचा पाणीपुरवठा कट करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी आज रोजी दिली आहे.