काय म्हणायचं या बापाला? जन्मदात्या पित्यानेच केला लेकीवर बलात्कार; आईने नराधम बापाला शिकवला चांगलाच धडा

वडिल आणि मुलीच्या नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना औरंगाबाद मध्ये घडलीय. आपल्या 13 वर्षीय मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधम बापास कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे(In Aurangabad, a father raped his own daughter).

  औरंगाबाद : वडिल आणि मुलीच्या नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना औरंगाबाद मध्ये घडलीय. आपल्या 13 वर्षीय मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधम बापास कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे(In Aurangabad, a father raped his own daughter).

  औरंगाबाद शहरातील एमआयडीसी परिसरात 27 जानेवारी 2019 रोजी ही घटना घडली. पिडीतेच्या आईनेच या नराधम नवऱ्याविरोधात तक्रार दाखल केली.

  मुलगी घरात झोपली असताना यानराधम बापाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. ही बाब पीडीत मुलीच्या आईच्या निदर्शनास आली. यावेळी मुलीने घडलेला प्रकार आईला सांगीतला. यापूर्वीही अनेकदा पित्याने असे कृत्य केल्याचे या मुलीने सांगीतले.

  पीडितेच्या आईने एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. घाटीत वैद्यकीय तपासणी स्पष्ट झाल्यानंतर एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. दोन्ही बाजूंच्या युक्तिवादानंतर व साक्षी पुराव्यावरून न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवत कायद्याच्या कलम 14 अन्वये दहा वर्षे सक्तमजुरी व दहा हजार रुपये दंड तर कायद्याच्या कलम 6 अन्वय वीस वर्षे सक्तमजुरी व तीस हजार रुपये दंड व दंड न भरल्यास एक वर्ष सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली तसेच दंडाची 40 हजाराची रक्कम पिडीतेला सुपूर्द करण्याचे आदेश नमूद केल्याचे सरकारी वकील सुदेश शिरसाट यांनी यावेळी सांगितले.

  हे सुद्धा वाचा
  • 2022