
शहरातील आरोग्य केंद्रासमोर दोघे-तिघे उभे राहून त्यांचा आधार कार्ड मोबाईल नंबरचा फोटो काढून शिऊर येथे एका आरोग्य केंद्रातील डॉक्टरला पाठवून त्याआधारे लस न घेताच लसीकरण झाल्याचे प्रमाणपत्र काढून घेत होते.
औरंगाबाद : औरंगाबाद शहरातील (Aurangabad City) जिन्सी पोलिस स्टेशन पोलिसांनी लस न घेता प्रमाणपत्र देणाऱ्या चौघांना गजाआड केले (Four people who gave certificates without getting vaccinated were arrested). औरंगाबाद जिल्हाधिकारी (Collector) यांच्या आदेशाने शासकीय सेवा नो रेशन नो पेट्रोल नो पगार अशा पद्धतीचे वेगवेगळे उपक्रम जिल्हाधिकारी राबवित असताना लस घेतल्याचे प्रमाणपत्र (Vaccination Certificate) दाखविणे अनिवार्य होते. त्याकरिता नागरिकांनी शहरांमध्ये लस घेण्यासाठी आरोग्य केंद्रावर गर्दी केली होती परंतु काही आरोग्य कर्मचारी यांनी या गोष्टीचा फायदा घेत शहरांमध्ये धंदाच मांडला होता.
शहरातील आरोग्य केंद्रासमोर दोघे-तिघे उभे राहून त्यांचा आधार कार्ड मोबाईल नंबरचा फोटो काढून शिऊर येथे एका आरोग्य केंद्रातील डॉक्टरला पाठवून त्याआधारे लस न घेताच लसीकरण झाल्याचे प्रमाणपत्र काढून घेत होते. ही माहिती जिन्सी पोलिस स्टेशनला मिळाली असता पोलीस निरीक्षक व्यंकटेश केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक तांगडे यांनी तेथे जाऊन त्यांना अटक करून ताब्यात घेतले व त्यांच्याकडील प्रमाणपत्र हस्तगत केले पुढील कारवाई सुरू आहे.