In the meeting of Minister Vijay Vadettiwar in Aurangabad, there was a lot of confusion among the workers

औरंगाबाद :  राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री आणि काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार(Vijay Vadettiwar ) यांच्या औरंगाबादमधील बैठकीत जोरदार गोंधळ पाहायला मिळाला. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर एक बैठक आयोजित करण्यात आली होती.

औरंगाबाद जिल्ह्यातील करमाड येथे ही बैठक आयोजीत करण्यात आली होती. नेत्यांनी समाजासाठी काय केलं असा प्रश्न या बैठकीत उपस्थित झाला. यावेळी नेत्यांच्या समर्थकांनी आक्रमक रुप घेतलं. यातूनच झालेल्या वादाचं रुपांतर धक्काबुक्की आणि बाचाबाचीतही झाले.

विजय वडेट्टीवार यांच्या या बैठकीत झालेल्या गोंधळाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे. ओबीसी नेत्यांमध्येच गट पडल्याची चर्चेला यामुळे पून्हा उधाण आले आहे. यापूर्वीही ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर आयोजीत बैठकांमध्ये वाद झाले आहेत.