It has become a hub of spicy chillies, Shivna village in Sillod taluka, in foreign markets

येथील या झणझणीत मिरचीकडे आता परदेशातीलही व्यापारी आकर्षित झाले आहे. परदेशात येथील मिरचीला प्रचंड मागणी आहे. तर परदेशी बाजारपेठेत रोज दीड हजार ते तीन हजार पोत्यांची आवक सुरूच आहे.

    औरंगाबाद :  जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्याची प्रमुख ओळख म्हणजे अजिंठा येथील लेणी ज्या जगप्रसिद्ध आहेत. परंतु, आता आणखी एका गोष्टीने  सिल्लोड तालुक्याची ओळख जगभरात होत आहे. सिल्लोड तालुक्यातील शिवाई देवी संस्थानच्या नावावरून शिवना या गावाची ओळख आहे. आता या गावातील शेतकऱ्यांनी आपली स्वतःची ओळख निर्माण केली आहे. आता देशभरात सिल्लोड तालुक्यातील शिवना हे ‘मिरचीचे हब’  म्हणून प्रसिद्धीस आले आहे.


    शिवणा येथील काही शेतकरी मागच्या काही वर्षापासून नगदी पिकांकडे वळले आहेत. त्यात त्यांनी प्रामुख्याने  मिरचीचे उत्पादन घ्यायला सुरुवात केली. त्यांना चांगलं उत्पादन मिळू लागल. त्यामुळे, येथील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणत मिरचीची लागवड सुरु केली. तर, मिरचीचे भरघोस  उत्पादन  होऊ लागले. मिरचीच्या चांगल्या गुणवत्तेमुळे येथील हिरव्या मिरचीला देशभरात मागणी वाढली आहे. अगदी झणझणीत चविष्ट आणि गडद लाल रंगामुळे या मिरचीची मागणी, भारतासोबत परदेशातही होऊ लागली आहे.   
    सध्या शिवण्याच्या बाजारपेठेत तब्बल दीड हजार ते तीन हजार पोत्यांची आवक दररोज सुरु आहे. तर, येथील मिरची ६० ते १८० रुपये प्रतिकिलोच्या  भावाने विकल्या जात आहे. लिलाव पद्धतीने येथील मिरचीची खरेदी बाजारपेठ सुरू आहे. सिल्लोड तालुक्यातील शिवना हे आता लाल मिरची खरेदीचे प्रमुख केंद्र म्हणून मराठवाड्यात ओळखले जाऊ लागले आहे. 
    येथील या झणझणीत मिरचीकडे आता परदेशातीलही व्यापारी आकर्षित झाले आहे. परदेशात येथील मिरचीला प्रचंड मागणी आहे. तर परदेशी बाजारपेठेत रोज दीड हजार ते तीन हजार पोत्यांची आवक सुरूच आहे. प्रतवारीनुसार भाव व सुकवलेल्या मिरचीची निर्यात हे येथील वैशिष्ट्य आहे. त्यामुळे मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश येथून व्यापारी मिरची खरेदीसाठी येत आहेत.