मुंबईहून दीड ते पावणे दोन तासांत औरंगाबादला पोहचणार; मुंबई ते नागपूर धावणार बुलेट ट्रेन !

मुंबई-अहमदाबाद आणि दिल्ली-वाराणसी बुलेट ट्रेनच्या धर्तीवर मुंबई ते नागपूर बुलेट ट्रेन सुरू करण्याचा विचार आहे. रेल्वे राज्यमंत्री म्हणून हा प्रकल्प माझ्या मनात आहे. तो पूर्ण करण्यास माझे प्राधान्य राहील. मुंबई ते औरंगाबाद बुलेट ट्रेन सुरू झाली तर दीड ते पावणे दोन तासांत मुंबईहून औरंगाबादला जाता येऊ शकते. तसेच, तीन ते साडेतीन तासांत आपण मुंबईहून नागपूरला जाऊ शकतो. तसे झाल्यास या भागाचा कायापालट होऊ शकतो असे रावसाहेब दानवे म्हणाले.

    औरंगाबाद : रेल्वेराज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी मुंबई ते नागपूर व्हाया औरंगाबाददरम्यान बुलेट ट्रेन प्रकल्प उभारण्याचे सूतोवाच केले आहे. दानवे या खात्याचे मंत्री झाल्यानतर प्रथमच आपल्या मतदारसंघात जन आशीर्वाद यात्रेनिमित्त आले होते. या पार्श्वभूमीवर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी मुंबई-औरंगाबाद ते नागपूर या मार्गावर बुलेट ट्रेन उभारण्याचा विचार बोलून दाखवला.

    त्यावर आपला खुलासा द्यायलाही ते विसरले नाहीत ते म्हणाले की, खासदार किंवा मंत्र्यांच्या म्हणण्यानुसार रेल्वेचा मार्ग बदलत नाही. व्यवहार्यतेचा मुद्दा असतो. त्यानुसारच मार्ग उभारले जातात. त्यानुसार मुंबई-नागपूर बुलेट ट्रेनबाबतही मी अभ्यास केला. अधिकाऱ्यांची बैठक घेतली. असा काही मार्ग होऊ शकतो का यावर चर्चा केली. तर ते शक्य आहे, असे आमच्या निदर्शनास आले आहे, असा दावाही दानवे यांनी केला आहे.