drama competition

राज्य नाट्यस्पर्धा १५ जानेवारीपपासून (State Drama Competition Cancelled) घेतली जाणार होती. मात्र अचानक स्पर्धा पुढे ढकलण्यात आली आहे. याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत कलावंतांनी सांस्कृतिक कार्य संचालनालयात ठिय्या आंदोलन केले.

    औरंगाबादः मराठी हौशी राज्य नाट्य स्पर्धेसाठी (State Drama Competition) गेल्या दोन महिन्यांपासून तयारी करणाऱ्या कलाकारांची वाढत्या कोरोना संसर्गामुळे (Corona Spread) निराशा झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार १५ जानेवारीपपासून ही राज्य नाट्यस्पर्धा (State Drama Competition Cancelled) घेतली जाणार होती. मात्र अचानक स्पर्धा पुढे ढकलण्यात आली आहे. याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत कलावंतांनी सांस्कृतिक कार्य संचालनालयात ठिय्या आंदोलन केले. ठरलेल्या वेळेत स्पर्धा घ्या, अन्यथा जमा केलेली रक्कम परत करा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

    सांस्कृतिक कार्य संचालनालयाने सोशल मीडियाद्वारे या स्पर्धा पुढे ढकलत असल्याचा संदेश दिला. त्यामुळे कलावंत, दिग्दर्शकांना न विचारताच स्पर्धकांवर निर्णय लादण्यात आल्याचा आरोप कलावंतांकडून होत आहे. स्पर्धा रद्द होणार असेल तर संघांनी जमा केलेली रक्कम परत करावी. तसेच प्रत्येक संघास २५ हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

    स्पर्धा पुढे ढकलण्यात आल्याचा निर्णय सोशल मीडियाद्वारेच कलावंतांपर्यंत पोहोचला आहे. पूर्वीदेखील अशाच प्रकारे स्पर्धा रद्द करण्यात आल्या होत्या. मात्र, शासनाने कलावंतांना विचारात घेऊन निर्णय घ्यायला हवा होता. ५० टक्केंच्या क्षमतेने नाट्यगृहे सुरु राहून, स्पर्धा घेतल्या जातील, अशी कलावंतांची अपेक्षा होती.