
औरंगाबाद( New Variant Of Dengue Found In Aurangabad) जिल्ह्यातील आरोग्ययंत्रणा खडबडून जागी झाली आहे. रुग्णाच्या शरीरात डेंग्यूची लक्षणे(Symptoms Of Dengue) आढळून येत असली तरीही डेंग्यूची चाचणी(Dengue Test) मात्र निगेटिव्ह येत आहे.
औरंगाबाद: आरोग्य यंत्रणेसमोर आता नवे आव्हान उभे राहिले आहे. कोरोना पाठोपाठ डेंग्यूच्या विषाणूतही बदल (New Varient Of Dengue) दिसून येत असल्याचा इशारा देण्यात आला आहे. यामुळे औरंगाबाद( New Variant Of Dengue Found In Aurangabad) जिल्ह्यातील आरोग्ययंत्रणा खडबडून जागी झाली आहे. रुग्णाच्या शरीरात डेंग्यूची लक्षणे(Symptoms Of Dengue) आढळून येत असली तरीही डेंग्यूची चाचणी(Dengue Test) मात्र निगेटिव्ह येत आहे. त्यामुळे आरोग्य तज्ज्ञही गोंधळले आहेत. दरम्यान, शहरात गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेला सततचा पाऊस, विविध कॉलन्यांमध्ये सुरु असलेली रस्त्याची कामे यामुळे घरांभोवती पाणी साचलेले आहे. अशा वेळी डासांपासून रक्षण तरी कसे करावे, हा पेच नागरिकांसमोर आहे.
गेल्या ८ महिन्यांच्या तुलनेत सप्टेंबरमध्ये डेंग्यूच्या रुग्णांची सर्वाधिक वाढ झाली आहे. लहान मुलांपासून मोठ्या माणसांमध्येही ताप आणि अंगदुखीची लक्षणे जाणवत आहेत. जिल्ह्यात जानेवारी ते सप्टेंबर महिन्यात आतापर्यंत १०४ रुग्णांची नोंद झाली आहे. एकट्या सप्टेंबर महिन्यातील रुग्णांची संख्या ७७ एवढी आहे. आतापर्यंत २६० जणांच्या टेस्ट करण्यात आल्या आहेत. हे आकडे फक्त शासकीय रुग्णालयात नोंद झालेले असून खासगी रुग्णालयांतील रुग्णांची संख्या आणखी जास्त आहे. त्याामुळे डेंग्यूच्या रुग्णांची आकडेवारी निश्चितच चिंता वाढवणारे आहेत.
औरंगाबादमधील शासकीय रुग्णालयात दाखल होणाऱ्या अनेक रुग्णांमध्ये डेंग्यूसारखीच लक्षणे दिसून येत आहेत. परंतु डेंग्यूची चाचणी केली असता त्याचा अहवाल निगेटिव्ह येत आहे. रुग्णाच्या शरीरारीत प्लेटलेटचे प्रमाण कमी होणे, खूप ताप येणे, अंगावर चट्टे येणे, थंडी वाजून येणे आदी लक्षणे दिसून येत आहेत, अशी माहिती घाटी रुग्णालयातील मेडिसीन विभागप्रमुख डॉ. मीनाक्षी भट्टाचार्य यांनी दिली.