lockdown

औरंगाबाद महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्ष लॉकडाऊनला विरोध करून सर्वसामान्यांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचं चित्र दिसतंय. तर सत्ताधारीदेखील लॉकडाऊनपायी जनक्षोभ ओढवून घ्यायला तयार नसल्याचं चित्र औरंगाबादमध्ये दिसू लागलंय. 

    औरंगाबाद : जिल्ह्यात लागू करण्यात आलेला लॉक डाऊन शासनाचे पुढील आदेश येईपर्यंत स्थगित करण्यात आला असल्याची माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी मंगळवारी  रात्री उशिरा घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

    कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने औरंगाबाद जिल्ह्यात ३१ मार्च ते ९ एप्रिल या काळात शक्तीचा लॉक डाऊन जाहीर करण्यात आला होता. प्रशासनाने जाहीर केलेल्या सक्तीच्या लॉकडाऊनला शहरातील विविध पक्ष संघटनांनी कडाडून विरोध केला होता. तसेच लॉकडाऊनच्या विरोधात एम आय एम च्या वतीने बुधवारी दुपारी जन आक्रोश मोर्चा चे आयोजन करण्यात आले होते.

    सक्तीच्या लॉकडाऊनला सर्व स्तरातून होत असलेला विरोध पाहता जिल्हा प्रशासनाने राज्य शासनाचे पुढील आदेश येईपर्यंत सक्तीचा लॉकडाऊन रद्द केला आहे. जिल्‍हाधिकारी कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेस पोलीस आयुक्त डॉक्टर निखील गुप्ता, मनपा आयुक्त आस्तिक कुमार पांडे, ग्रामीण पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील आदींची उपस्थिती होती.