वर्ध्यातील ओजस्वी उदय साळवे हिची वरिष्ठ (सीनीयर) राष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धेकारिता महाराष्ट्र संघात निवड

वर्धा येथिल रहिवासी ओजस्वी उदय साळवे हिची राष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धेकारिता महाराष्ट्र संघात निवड झाली आहे. सदर राष्ट्रीय स्पर्धा ही दि १ ते ३ ऑक्टोबर२०२१ दरम्यान जमशेदपुर (झारखंड) येथील टाटा स्टेडियम यथे होणार आहे.

    औरंगाबाद येथिल भारतीय खेल प्राधिकरण येथे नुकतेच राज्यस्तरिय वरिष्ठ धनुर्विद्या निवड चाचणीचे(Senior National Archery Competition)  आयोजन महाराष्ट्र धनुर्विद्या संघटना व भारतीय खेल प्राधिकरण यांच्या सयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.त्यामधे वर्धा येथिल रहिवासी ओजस्वी उदय साळवे हिची राष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धेकारिता महाराष्ट्र संघात निवड झाली आहे. सदर राष्ट्रीय स्पर्धा ही दि १ ते ३ ऑक्टोबर२०२१ दरम्यान जमशेदपुर (झारखंड) येथील टाटा स्टेडियम यथे होणार आहे. यामधे ओजस्वी महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे.

    याआधी ओजस्वीने देहरादून येथे जूनियर राष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धेत महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व केले होते. ओजस्वी सद्या नांदगांव खंडेश्वर येथील एकलव्य धनुर्विद्या क्रीडा अकादमी येथे प्रशिक्षक अमर जाधव यांच्या मार्गदर्शनात सराव करित आहे. ओजस्वीच्या निवड़ीबद्दल एकलव्य धनुर्विद्या अकादमीचे मार्गदर्शक शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त सदानंद जाधव,महा.धनुर्विद्या संघटनेचे सचिव प्रमोद चांदुरकर,वर्धा जिल्हा धनुर्विद्या संघटनेचे दिपक वानवे ,प्रशिक्षक नितिन अंभोरे,पवन जाधव , विलास मरोटकर,अनूप काकडे, शिक्षकवृंद, पालक यांनी अभिनंदन केले आहे. ओजस्वीला अभ्यासासोबत खेळण्यासाठी प्रोत्साहन देणारे वडील उदय साळवे. जि. प.आरोग्य विभागात जिल्हा प्रशिक्षण पथक वर्धा येथे कार्यरत आहे.आणि आई सौ.प्रतिभा उदय साळवे ह्या जि.प.शाळा इसापूर येथे शिक्षिका म्हणून कार्यरत आहे.