‘आमचा दुखवटा विलगीकरण होत नाही तोपर्यंत सुरूच राहणार’ एस टी कर्मचारी संपावर ठाम

औरंगाबाद मध्यवर्ती बस स्थानक क्रमांक दोन मधील एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रतिक्रीया जाणून घेतल्या असता त्यांनी, ‘आमचा दुखवटा सुरूच आहे. हा आमचा संप नसुन आमचा हा दुखवटा आहे. हा दुखवटा जोपर्यंत एसटी कर्मचाऱ्यांच शासनात विलीनीकरण होत नाही तोपर्यंत सुरू राहणार आहे. असं या कर्मचाऱ्यांनी सांगीतलं. ते पुढं म्हणाले की, ‘मुळात हा संप नाही दुखवटा आहे. अजय गुजर कोण आहे हे आम्हाला माहीत नाही. ते कोणत्या संघटनेचे आहे हे आम्हाला माहित नाही. औरंगाबादचे असून सुद्धा आम्हाला अजय गुजर हे कोण आहे हे माहित नाही. जोपर्यंत सदावर्ते साहेब म्हणत नाहीत तोपर्यंत आमचा हा दुखवटा सुरूच राहणार आहे.’

    औरंगाबाद : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी गेल्या पंचेचाळीस दिवसांपासून संप पुकारला आहे. हा संप समाप्त होण्यासाठी शासनाने अनेक प्रयत्न केले. परंतु, कर्मचारी विलगीकरणावर ठाम आहेत. मुंबई मधील आजाद मैदानत जे संपकरी होते त्यांनी आपला संप मागे घेतला असून एसटीच्या चतुर्थश्रेणी कामगार संघटनेचे नेते अजय गुजर यांनी संप मागे घेण्याचे पत्रकार परिषदेतून जाहीर केले.

    या पत्रकार परिषदेनंतर औरंगाबाद मध्यवर्ती बस स्थानक क्रमांक दोन मधील एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रतिक्रीया जाणून घेतल्या असता त्यांनी, ‘आमचा दुखवटा सुरूच आहे. हा आमचा संप नसुन आमचा हा दुखवटा आहे. हा दुखवटा जोपर्यंत एसटी कर्मचाऱ्यांच शासनात विलीनीकरण होत नाही तोपर्यंत सुरू राहणार आहे. असं या कर्मचाऱ्यांनी सांगीतलं.

    ते पुढं म्हणाले की, ‘मुळात हा संप नाही दुखवटा आहे. अजय गुजर कोण आहे हे आम्हाला माहीत नाही. ते कोणत्या संघटनेचे आहे हे आम्हाला माहित नाही. औरंगाबादचे असून सुद्धा आम्हाला अजय गुजर हे कोण आहे हे माहित नाही. जोपर्यंत सदावर्ते साहेब म्हणत नाहीत तोपर्यंत आमचा हा दुखवटा सुरूच राहणार आहे.’

    काही कर्मचाऱ्यांनी सांगितले की फुट पडली असती तर २५० डेपोतील सर्वच गाड्या सुरू झाल्या असत्या. परंतु जी काल परवा एकजूट होती ती आजही तशीच आहे. संपामध्ये फूट पाडण्याचा भरपूर प्रयत्न केला. अजय गुजर यांनी संपाची नोटीस दिली त्यांनी ते वापस घेतली असेल त्यामुळे त्यांच्यामुळे काही फुट पडण्याचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे त्यांच्या संपाचा आणि आमच्या दुखवट्याचा काहीही संबंध नाही सदार्वते कष्टकऱ्यांचे वकील आहेत ते जोपर्यंत काही निर्णय देत नाही तो पर्यंत दुखवटा सुरू राहणार. ९२००० कर्मचाऱ्यांनी त्यांचं वकीलपत्र सदावर्तेंकडे दिलं आहे ते आदेश देत नाही तोपर्यंत हा दुखवटा सुरूच राहणार आहे.