पंचनामे झाले; नुकसानग्रस्तांना शासन आर्थिक मदत कधी देणार ? खासदार इम्तियाज जलील

शेतकरी बांधव व ग्रामस्थांना शासनस्तरावरुन आर्थिक मदत मिळाली का ? याची शहानिशा करण्यासाठी खासदार इम्तियाज जलील यांनी नुकसानग्रस्त भागाला प्रत्यक्ष भेटी देऊन स्थळपाहणी केल्याने अधिकारी वर्गांची तारांबळच उडाली. पुन्हा एकदा सिध्द झाले की नुकसानग्रस्त भागातील शेतकरी बांधव व ग्रामस्थांची शासनाने फक्त चेष्टाच केली असल्याचे निदर्शनास .....

  औरंगाबाद (Aurangabad) : औरंगाबाद जिल्ह्यात अतिवृष्टी (heavy rains) आणि नदी नाल्यांना (floods in river) आलेल्या महापुरामुळे शेतकरी बांधवांचे व ग्रामस्थांचे आतोनात आर्थिक नुकसान (financial assistance) झाले असून महाविकास आघाडी सरकारचे मंत्री, आमदार व सत्ताधारी पक्षाचे वरिष्ठ नेतेमंडळी यांनी पाहणी दौरा करुन नेहमीप्रमाणे फोटोसेशन केले आणि जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना तात्काळ पंचनामे करुन आठ ते दहा दिवसात शासनाच्या वतीने आर्थिक मदत करण्याचे आश्वासन दिले होते.

  शेतकरी बांधव व ग्रामस्थांना शासनस्तरावरुन आर्थिक मदत मिळाली का ? याची शहानिशा करण्यासाठी खासदार इम्तियाज जलील यांनी नुकसानग्रस्त भागाला प्रत्यक्ष भेटी देऊन स्थळपाहणी केल्याने अधिकारी वर्गांची तारांबळच उडाली. पुन्हा एकदा सिध्द झाले की नुकसानग्रस्त भागातील शेतकरी बांधव व ग्रामस्थांची शासनाने फक्त चेष्टाच केली असल्याचे निदर्शनास येत असल्याचे खासदार इम्तियाज जलील यांनी सांगितले.

  खासदार इम्तियाज जलील यांनी शिवना नदी काठच्या सर्व नुकसानग्रस्त भागात पाहणी दौरा करुन गंगापूर, कन्नड व खुलताबाद तालुक्यातील संबंधित विभागाची आढावा बैठक घेवुन उर्वरीत भागाचे पंचनामे युध्दस्तरावर पूर्ण करुन नुकसानग्रस्तांना तात्काळ आर्थिक मिळावी म्हणून सविस्तर अहवाल राज्य शासनाला सादर करण्याचे निर्देश दिले.

  गंगापूर, कन्नड व खुलताबाद तालुक्यातील शेतकरी बांधव व सर्वसामान्य नागरीकांची कामे तालुक्यातील विविध कार्यालयात वर्षानुवर्षे प्रलंबित असुन त्यांच्यावर संबंधित काही अधिकारी व कर्मचारी कोणत्याही प्रकारची कार्यवाही करत नसल्याचे अनेक तक्रारी स्थानिक नागरीकांनी खासदार इम्तियाज जलील यांच्याकडे करुन अर्जदार व तक्रारदारांना कशा प्रकारे मानसिक त्रास देवुन आर्थिक शोषण करत असल्याचे निदर्शनास आणुन दिले असल्याने खासदार इम्तियाज जलील यांनी बैठकीत उपस्थित असलेल्या सर्व अधिकाऱ्यांना प्रलंबित कामे, प्रश्न, समस्या व तक्रारींचे तात्काळ निवारण करण्याचे आदेश दिले.

  मोडकळीस व टिनशेडमध्ये असलेल्या शाळांची ‘सीएसआर फंड’मधून पुर्नबांधणी करणार – इम्तियाज जलील, खासदार
  (Tinshed schools to be rebuilt from CSR fund Imtiaz Jalil MP)
  खासदार इम्तियाज जलील यांनी जिल्ह्यातील अनेक शाळांना प्रत्यक्ष भेटी देवुन स्थळपाहणी केली असता त्यामध्ये काही शाळांतील छतामधून पाणी गळती, भिंतींना तडे गेल्याचे, विद्यार्थीयांना स्वच्छतागृह, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व जमीनीवर फर्शीच नसल्याचे निदर्शनास आले. खासदार इम्तियाज यांनी शाळांची अशी भयानक दुर्दशा पाहता आढावा बैठकीत औरंगाबाद जिल्ह्यातील ज्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना बसण्यास जागा नाही.

  वर्षानुवर्षे डागडुजी न झालेल्या शाळा, मोडकळीस आलेल्या शाळा, वर्गखोल्यांचे अपुर्ण बांधकाम व विशेष म्हणजे टिनशेडमध्ये असलेल्या शाळांची तालुकानिहाय यादी सादर करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. विद्यार्थीयांना शिक्षणात कोणत्याही प्रकारची अडचण येवु नये त्यांना विविध प्रकारची सोयीसुविधा मिळाव्या म्हणून सदरील सर्व शाळांची, वर्गखोल्यांची डागडुजी व पुर्नबांधीणी औरंगाबाद शहरातील औद्योगिक कंपन्यांच्या सिएसआर निधीतुन करण्यात येणार असल्याची माहिती खासदार इम्तियाज जलील यांनी दिली.